हिंगोली । प्रतिनीधी (विश्वनाथ देशमुख)
दि.२९,मराठा आरक्षण कायम ठेवणे व विविध मागण्यांसाठी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने सेनगांव तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने आज दि.२९ सप्टेंबर मंगळवार रोजी ढोल बजाव आंदोलन करीत शालेय विद्यार्थ्यांनींच्या वतीने मुख्यमंत्री यांना तहसिलदार जिवकुमार कांबळे यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले आहे.
ढोल बजाव आंदोलनास सेनगांव शहरातील आप्पास्वामी प्रवेशव्दार येथुन सुरुवात होऊन पोलीस स्टेशन,बसस्थानक ते तहसिल कार्यालयावर धडकले.
यावेळी आदोंलकांनी विविध घोषणा बाजी करत आरक्षण आमच्या हक्काचे,नाही कोनाच्या बाप्पाचे,एक मराठा लाख मराठा घोषणांनी परीसर दुमदुमुन गेला होता.निवेदनातील प्रमुख मागण्या मा.सर्वाच्च न्यायालयाने मराठा आरक्षणा संदर्भात दिलेली स्थगिती उठविण्या बाबत तात्काळ योग्य ती कार्यवाही करावी,मराठा समाजास आरक्षण देवुनच नविन नोकर भरती करावी,मा.सर्वाच्च न्यायालयाने दिलेल्या स्थगितीमुळे या प्रकरणाचा अंतिम निपटारा होईपर्यंत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सवलती,महाविद्यालयातील व वैद्यकीय महाविद्यालयातील प्रवेश प्रक्रिया चालू ठेवण्यात याव्यात,सारथी संस्थेची नोकर कपात थांबवुन हि संस्था बंद करण्याचा घाट शासनाने घालु नये,सारथी संस्थेतील सर्व योजना पुर्ववत चालू ठेवुन तिच्या विकासासाठी प्रयत्न करावेत, सध्याच्या कोविड-१९ च्या परीस्थितीत आंदोलन करण्यास लावुन,मराठा समाजाचे आरोग्य धोक्यात आणु नये तसेच सध्याच्या मा.सर्वाच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे मराठा समाजामध्ये प्रचंड अस्वस्था व मोठ्या प्रमाणात प्रचंड असंतोष आहे .
त्यामुळे मराठा समाज मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्याच्या तयारीत आहे.समाजाचे आरोग्य धोक्यात येवुन संपुर्ण समाज कोविड-१९ च्या महामारीस बळी पडु शकतो यामुळे उद्भभवणा-या संपुर्ण परीस्थितीस शासन जबाबदार राहील असे नमुद करुन शासनाने आरक्षण तात्काळ देऊन विविध मागण्या मान्य कराव्यात नसता मराठा समाज तिव्र आंदोलन छेडेल असा ही इशारा सकल मराठा समाजाच्या वतीने देण्यात आला.यावेळी सर्वच राजकीय पक्षातील मराठा नेते,पदाधिकारी व मराठा समाज हजारोच्या संख्येने उपस्थित होते.

