shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

मांजरसुंबा येथे होणाऱ्या उसतोड कामगार मेळाव्यास मोठ्या संख्येने उपस्थित रहा : नामदेव गायकवाड, गणेश खांडेकर यांचे आवाहन..!!

केज | जिल्हा प्रतिनिधी : प्रकाश मुंडे:
महाराष्ट्र ऊसतोड कामगार ,मुकादम व वाहतूक दार संघटना शिवसंग्राम आयोजित करण्यात आलेल्या मांजरसुंबा येथे होणाऱ्या ऊसतोड कामगार वाहतूक दार व मुकादम भाववाढीसाठी महत्वपुर्ण बैठकीचे आयोजन शिवसंग्राम चे संस्थापक अध्यक्ष विनायकरावजी मेटे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली व शिवसंग्राम उसतोड कामगार संघटनेचे नेते बबनराव माने यांच्या मार्गदर्शनाखाली दि.28/09/2020वार सोमवार रोजी  बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.त्या बैठकीसाठी मोठ्या संख्येने उपस्थित रहान्याचे आवाहन शिवसंग्राम केज तालुक्याचे जेष्ठ नेते नामदेव बप्पा गायकवाड व शिवसंग्राम युवक आघाडी केज तालुका अध्यक्ष गणेश खांडेकर यांच्या वतीने करण्यात आले आहे.


बीड जिल्हा हा उसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो . त्या मध्ये केज तालुक्यातुन उसतोड कामगार जास्त संख्येने स्थलांतरित होतात.  उसतोड कामगारांच्या प्रश्नावर आवाज उठवण्यासाठी ऊसतोड कामगार ,वाहतूकदार व मुकादम यांच्या प्रमुख मागण्या राज्य सरकारने मान्य कराव्यात या  संदर्भात बैठक घेण्यात येणार आहे. या साठी सर्व केज तालुक्यातील ऊसतोड कामगार, वाहतूक दार,व मुकादम तसेच सर्व ऊसतोड मजूर यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन नामदेव बप्पा गायकवाड व गणेश खांडेकर यांच्या वतीने करण्यात आले आहे.
close