shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

गडचिरोली : अत्यवस्थ स्थितीत भरती झालेला ब्रह्मपुरी येथील ४७ वर्षीय व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू...!!

तर नव्याने २८ बाधिताची भर २९ कोरोनामुक्त

गडचिरोली ता.८ :- सहा सप्टेंबर रोजी पहाटे २.३० वा. ब्रह्मपुरी येथील ४७ वर्षीय ताप, झटके व श्वसनास त्रास असलेला रूग्ण गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती झाला. यावेळी तातडीने रुग्णालयाकडून उपचार प्रक्रिया राबविण्यात आली. यावेळी लक्षणे पाहून सदर रुग्णाची तुरंत तपासणी करण्यात आली. यावेळी त्याचा कोरोना अहवाल सकारात्मक आला. यादरम्यान सदर रुग्ण अत्यावस्थ असल्याने उपचार सुरू होते. साधारण त्याच दिवशी म्हणजे दि. ६ सप्टेंबर रोजी सकाळी ७.४५ वा. प्रकृति बिघडल्याने त्याचा मृत्यू झाला असे आरोग्य विभागाने कळविले आहे.

या दरम्यान कोरोना बाबत अधिक पडताळणीकरीता त्याचे नमुने आरटीपीसीआर तपासणी करण्याकरीता घेण्यात आले होते. त्याचे अहवाल काल रात्री (दि.७ सप्टेंबर रोजी) प्रशासनाकडे प्राप्त झाले. सदर रुग्ण कोरोना या संसर्गामूळे मृत्यू पावला हे आरटीपीसीआर तपासणी नंतर प्रशासनाकडून जाहीर करण्यात आले आहे. तसेच सदर रूग्ण चंद्रपूर जिल्हयातील असल्याने तसेच बाधितही जिल्हयाबाहेर झाला असल्याने त्याची नोंद चंद्रपूर जिल्हयात झाली आहे. तसेच सदर मृत रुग्णाची पत्नी यावेळी सोबत होती तिचाही अहवाल आरटीपीसीआर तपासणीत सकारात्मक मिळाली आहे. याबाबत संबंधित ठिकाणच्या प्रशासनास कळविण्यात आले आहे. मृत कोरोना बाधिताचा अंतिम विधी जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून गडचिरोली येथे आरोग्य विभागाच्या मार्गदर्शक सूचनांनूसार करण्यात आला.

आज  जिल्ह्यात २८ नवीन कोरोना बाधित आढळले असून २९ जन कोरोनामुक्त झाले आहे.यामुळे जिल्हयातील सक्रिय कोरोना बाधितांची संख्या २४५ झाली असून एकुण बाधित संख्या १३२९ झाली आहे. आत्तापर्यंत एकूण १०८३ रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर एकाचा दुदैवी मृत्यू जिल्हयाबाहेर झाला आहे.
close