प्रतिनिधी । रूषीकेष जगताप
श्रीगोंदा :- भारतरत्न एपीजे अब्दुल कलाम यांच्या प्रेरणेने काम करीत असलेले अग्निपंख फाउंडेशन श्रीगोंदा येथील दिव्यांग सहभागातून त्यांना एक घरकुल भेट देण्यात आले. (मनोज माने )हे मूळ कोल्हापूरचे मात्र ते दोन्ही पायांनी अपंग आहे, तर त्यांचा विवाह पारगाव येथील एक पायाने अपंग असलेली (जयश्री माने) शी झाला. योग्य युगंधरा रुपी ने त्यांच्या संसारात रूपी वेली त्यांना एक कन्या झाली
मात्र जीवनात जगण्यासाठी संघर्ष सुरू झाला. त्यांना पाय ठेवायलाही स्वतःची जागा नाही. घर भाडे द्यायला पैसे कुठून आणणार अशा परिस्थितीत ते पेडगावचे वनविभागाच्या जागेत अतिक्रमण करून शेड उभी केली, आणि आडोसा केला. मात्र वन विभागाच्या अतिक्रमण पथकाने याच्यावर हातोडा टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र मनोज माने आणि जयश्री माने यांच्या डोळ्यातील अश्रू पाहून त्यांनी यांना 6 महिन्याची मुदत दिली.
तर ही बातमी वर्तमानपत्रांमध्ये प्रसिद्ध झाली त्यानंतर माने दाम्पत्याला घरकुल बांधून देण्याचा निर्णय अग्निपंख फाउंडेशनने घेतला व त्यांनी त्यांना एक घरकुल भेट केले. प्रत्येकाला वाटते की आपले स्वतःचे एक घर असावे पण या दंपत्या कडे कसले घर आणि कसले दार अग्निपंख फाउंडेशनने या दाम्पत्याचे स्वप्न साकार केले. यामध्ये अग्निपंख फाउंडेशन चे जितके कौतुक करावे तितके कमी आहे.

