shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

दुचाकी अपघातातील डोक्याला जबर मार लागलेल्या युवकाला मुंबईला नेत असतांना वाटेवरच मृत्यू..!!

जळगाव प्रतिनिधि । प्रतिनिधी : प्रमोद चौधरी
एरंडोल:-एरंडोल तालुक्यातील जवखेडा सिम येथील अनिल संतोष पाटील (वय २७ वर्ष) हा युवक एम एच १९ जीए ८०३५ या क्रमांकाच्या दुचाकीने जैन कंपनी चोरटक्की  ते रिंगणगाव मार्गे जात असताना रस्त्यावर त्याची दुचाकी स्लिप होऊन तो खाली पडला व गंभीर जखमी झाला त्याला मुंबईला नेत असताना रस्त्यावर त्याचा आज रविवारी दुपारी तीन वाजेच्या दरम्यान मृत्यू झाला.
        

अनिल पाटील हा जैन कंपनीत कामाला होता.शनिवारी सकाळी तो कंपनीत जात असताना पाच सप्टेंबर रोजी सकाळी सहा वाजेच्या सुमारास त्याच्या दुचाकी ला अपघात झाला. त्यावेळी त्याला १०८ क्रमांक ॲम्बुलन्स ने जळगाव खासगी रुग्णालयात उपचारार्थ नेण्यात आले असता.दुसऱ्या दिवशी उपचारासाठी त्याला मुंबईला हलवावे लागेल असा सल्ला डॉक्टरांनी दिला. रविवारी त्याचा मुंबईला जात असताना  वाटेवर एरंडोल जवळ दुपारी तीन वाजेच्या सुमारास मृत्यू झाला.
 
याबाबत एरंडोल पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीस उपनिरीक्षक स्वप्निल उनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल चंद्रकांत पाटील, राहुल बैसाने पुढील तपास करीत आहेत.
फोटो - अनिल पाटील.
close