shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

अलिबागचे आमदार महेंद्र दळवी याना कोरोना ची लागण.. कोरोना पॉझिटीव्ह आल्याचे समजताच अर्ध्या प्रवासातून फिरले माघारी..!!


प्रतिनिधी। राजेश बाष्टे
 
अलिबाग : अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांची कोव्हिड-१९ चाचणी आज पॉझिटीव्ह आली आहे. त्यामुळे त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्वांनी कोरोना चाचणी करुन स्वतःची काळजी घ्यावी, असे आवाहन आ. दळवी यांनी केले आहे.

अलिबाग तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे.  अलिबागचे आ. महेंद्र दळवी यांनाही कोरोनाचा संसर्ग झाला आहे. आज (७ सप्टेंबर) ते मुंबईत सुरु होणाऱ्या विधिमंडळाच्या अधिवेशनाकरिता निघाले होते. धरमतर येथे पोहोचल्यावर त्यांना त्यांची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आल्याची माहिती मिळाली. तेथूनच ते माघारी फिरले आणि क्वारंटाईन झाले आहेत. 

त्यांना कुठलीही लक्षणे नाहीत, त्यांची प्रकृती ठणठणीत आहे, असे असले तरी पुढचे १० दिवस ते होम क्वारंटाईन राहणार आहेत.
जे कोणी आ.दळवी यांच्या संपर्कात आले असतील त्यांनी स्वतःची कोरोना चाचणी करुन घ्यावी, स्वतःची काळजी घ्यावी, असे आवाहन आ. महेंद्र दळवी यांनी केले आहे.
close