shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पिंपळदरी येथे शेतकऱ्यांना विद्यार्थ्यांकडून मधमाशी पालन बाबत मार्गदर्शन...!!

पिंपळदरी येथे शेतकऱ्यांना विद्यार्थ्यांकडून मधमाशी पालन बाबत मार्गदर्शन...!!
संगमनेर:- संगमनेर तालुक्यातील पिंपळदरी येथे शेतकऱ्यांना कर्मयोगी धुलाजी सीताराम पाटील कृषी महाविद्यालय; नाशिक येथील विद्यार्थी, महेंद्र चांगदेव रंधे यांच्याकडून पिंपळदरी येथे शेतकऱ्यांना मधमाशी पालना बाबत विद्यार्थ्याकडून मार्गदर्शन हा उपक्रम वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये जिल्ह्यांमध्ये राबविण्यात आला आहे. संगमनेर तालुक्यात पिंपळदरी येथे हा कार्यक्रम पहिल्यांदाच राबविण्यात येत आहे. यामध्ये महेंद्र चांगदेव रंधे हा या  शेतकऱ्यांना मधमाशी पालनाचे फायदे व यामधून येणारा मोबदला काय आहे. 

यांना चांगल्या पद्धतीने माहिती देत आहे. हा विद्यार्थी, कर्मयोगी धुलाजी  सीताराम पाटील कृषी महाविद्यालय नाशिक, येथील शिक्षक, प्राचार्य, शिक्षकेतर कर्मचारी, यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवत आहे. हा उपक्रम राबवन्या मागे मधमाशी पालन वाढवणे व शेतकऱ्यांना एक व्यवसायाला रस्ता मिळवा.

यासाठी महेंद्र चांगदेव रंधे , व कर्मयोगी धुलाजी सीताराम पाटील कृषी महाविद्यालय नाशिक हा उपक्रम राबवत आहे. यामध्ये त्यांना शेतकरी चांगला प्रतिसाद देत आहे.
close