विडा जि.प.गटातील विकास कामांना जि.प.सदस्य मुंडे कडुन चालना..!!
केज / जिल्हा प्रतिनिधी (प्रकाश मुंडे):-
बेंगळवाडी येथील अंगणवाडीच्या नूतून इमारत बांधकामासाठी जिल्हा वार्षिक योजने अंतर्गत 8 लक्ष रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता.शनिवारी अंगणवाडी बांधकामाच्या प्रत्यक्ष कामाचा शुभारंभ विडा गटाचे लोकप्रिय जिल्हा परिषद सदस्य विजयकांत मुंडे यांच्या शुभस्ते करण्यात आला आहे.
विडा जि.प.गटातील बेंगळवाडी येथे मागील कित्येक वर्षांपासून लहान मुलांना अंगणवाडी उपलब्ध नसल्याने त्यांना हनुमान मंदिर व सभागृहाचा पर्याय शोधून ज्ञानगर्ज करावे लागत होते.पर्यायी इमारत नसल्याचा परिणाम लहान मुलांच्या शिक्षणावर होत होता.त्यामुळे येथे अंगणवाडीसाठी नूतून इमारत उभारण्याची मागणी ग्रामस्थांकडुन वेळोवेळी करण्यात येत होती.सदरील मागणी व लहान मुलांच्या शिक्षणावर होत असलेल्या परिणामांचा गांभिर्याने विचार करून विडा गटाचे लोकप्रिय जिल्हा परिषद सदस्य विजयकांत मुंडे यांनी जिल्हा वार्षिक योजने अंतर्गत 8 लक्ष रुपयांचा निधी मंजूर करून घेत सदरील प्रश्न मार्गी लावला होता.
दरम्यान शनिवारी सकाळी 11:30 वा. नूतून अंगणवाडी ईमारत बांधकामाचा व रस्त्याच्या कामाचा प्रत्यक्ष शुभारंभ विडा गटाचे लोकप्रिय जि.प.सदस्य विजयकांत (भैय्या) मुंडे यांच्या शुभहस्ते करण्यात आला.प्रसंगी उपसरपंच बापूराव देशमुख,ग्रा.पं.सदस्य अशोक वाघमारे,शिवाजी वाघमारे,चंद्रकांत कुलकर्णी,युवा नेते सुरज पटाईत,विठ्ठल भोसले,बप्पा बर्दापुरकर,प्रकाश रोमण,चंद्रकांत शिंदे,शेषेराव शिंदे,निजाम खतिब,अंकुश पाटील यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

