shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

चोरट्यासह चोरीचे दागिने विकत घेणाऱ्या ज्वेलर्स मालकाला, कर्मचाऱ्याला अटकनारपोली पोलिसांची उत्तम कारवाई....!!


नारपोली पोलिसांची धडाकेबाज कारवाई..!!
प्रतिनिधी। मोहन शेगर : 
मुबंई : चोरीचे दागिने विकणाऱ्या चोरट्यासह ज्वेलर्स दुकान मालकाला व कर्मचाऱ्याला रंगेहात पकडण्यात आले. ही उत्तम कारवाई ठाणे पोलीस दलाच्या नारपोली पोलिसांनी केली. या कारवाईत २ लाख ६२ हजार रुपयांचे १०५ ग्रॅम वजनाचे सोने जप्त करण्यात आले.

ठाणे जिल्ह्यातील भिवंडी शहरातील कामतघर येथे पवार कुटुंबीय राहतात. ७ सप्टेंबर रात्री १०.३० ते ११.४५ वाजण्याच्या दरम्यान चोरट्याने पवार यांच्या घरातील सोन्याचे दागिने, मोबाईल व रोकड असा एकूण २ लाख ७७ हजार रुपयांचा मुद्देमाल पळवला. या प्रकरणी सौ. शीतल पवार यांनी नारपोली पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध (गु. र. क्र. ५२०/२०२०) भादंवि कलम ४५७, ३८० नुसार गुन्हा दाखल केला. 

 या गुन्ह्याचा तपास सुरू असताना खबºयाने चोरट्याची माहिती दिली. त्यानुसार पोलिसांनी भिवंडीतील बाजारपेठेतील एका ज्वेलर्स दुकानात चोरलेले दागिने विकताना आरोपी अनिकेत कदम (२१) याला अटक केली. तसेच चोरीचे दागिने विकत घेत असल्याने दुकान मालक बसंतीलाल कोठारी(४९) व कामगार देवीलाल नाई (४६) यांनाही अटक करण्यात आली. या कारवाईदरम्यान पोलिसांनी १०५ ग्रॅम वजनाचे २ लाख ६२ हजार रुपयांचे दागिने जप्त केले. 

सदर गुन्ह्याचा तपास पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, सह पोलीस आयुक्त सुरेश मेकला, अपर पोलीस आयुक्त अनिल कुंभारे, परिमंडळ २ चे उपायुक्त राजकुमार शिंदे, नारपोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मालोजी शिंदे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) रवींद्र वाणी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक आर. जे. व्हरकाटे, हवालदार सातपुते, पोलीस नाईक सोनगिरे, पोलीस शिपाई जाधव, पोलीस शिपाई शिरसाठ, पोलीस शिपाई बंडगर आदी पथकाने केला.
close