सावळीविहीर(राजकुमार गडकरी):
दर तीन वर्षातुन एकदा येणारा पुरुषोत्तममास किंवा अधिकमास म्हणजे धोंड्याचा महिना दिनांक 18 सप्टेंबर शुक्रवारपासून सुरू झाला असून तो 16 gऑक्टोबर 20 20 रविवार पर्यंत राहणार आहे .हा धोंड्याचा महिना म्हणजे अधिक मास हा राज्यामध्ये ,शहरांप्रमाणे, ग्रामीण भागातही मोठा धार्मिक महिना मानला जातो.
त्यामुळे श्रद्धाळू देवदर्शन ,तीर्थस्थानाना भेटी, गंगास्नान याला अधिक महत्त्व देतात. तसेच या धोंड्याच्या महिन्यात प्रत्येक नवीन जावई बापूंना खास आमंत्रण देऊन सासरी बोलावून पुरणपोळीचे, धोड्यांचे जेवन करून नवीन कपडेलत्ते, मिठाई,दागिने दिले जातात. अशी ही प्रथा आहे .मात्र यावर्षी कोरोणामुळे सर्व काही शांत शांत आहे. ना कोठे तीर्थस्थान ,ना कुठे देवदर्शन ,ना कुठे गंगास्नान, ना कुठे जावईबापूंना धोंड्याची जेवणावळी, या सर्व गोष्टी कोरोणा मुळे यावर्षी होताना दिसत नसून सर्व काही शांत शांत व साधेपणाने ह महिना साजरा करत आहे.
दर तीन वर्षांतून येणारा हा अधिक मास यावेळेस भद्रपदा संपताच व सर्वपित्री अमावस्या होताच सुरू झाला आहे. हा अश्विन अधिक मास यालाच मलमास किंवा पुरुषोत्तम मास असेही म्हटले जाते. या अधिक मासामध्ये श्री विष्णू पूजनाला अधिक महत्त्व असून , हिंदू पंचांगानुसार या अधिक मासाचा संबंध सूर्य आणि चंद्राच्या मार्गक्रमणाशी आहे. सूर्य वर्ष 365 दिवस आणि सुमारे सात तासाचे असते. तर चंद्र वर्ष हे 354 दिवसांचे मानले जाते .या दोन्ही सूर्य वर्ष व चंद्र वर्षांमध्ये अकरा दिवसाचे अंतर असते.
आणि हेच नंतर तीन वर्षात एक महिन्याच्या बरोबरीने होते. हे अंतर दूर करण्यासाठी प्रत्येक तीन वर्षात एक चंद्रमास येतो. व यास अधिक मास म्हटले जाते. कारण अधिक मासाचे अधिपती श्री विष्णू असल्यामुळे व श्रीविष्णूला पुरुषोत्तम म्हणत असल्यामुळे अधिक मसाला पुरुषोत्तम मास असेही म्हटले जाते .महाराष्ट्रात ग्रामीण भागात या अधिक मासाला धोंड्याचा महिना म्हणून मोठ्या प्रमाणात सर्वत्र संबोधले जाते. या धोंड्याच्या महिन्यात घरोघरी पूजा, आरत्या ,विविध धार्मिक कार्यक्रम होत असतात.
तसेच नवीन लग्न झालेल्या जावई बापूंना खास आमंत्रण देऊन बोलावून पुरणपोळीचे गोडधोड जेवण खाऊ घातले जाते. तसेच नविन कपडे, दागिने, आपापल्या मर्जीप्रमाणे केले जातात .अशी प्रथा महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागात दर अधिक मासात होत असते. विशेष करून या धोंड्याच्या महिन्यात पुरणपोळीचे जेवणात एक गोलाकार पदार्थही पुरण घालुन त्यास धोंडासमजुन त्यात चेष्टामस्करी म्हणून बारीक दगड ठेवला जातो व तोच धोंड्याचा खास प्रकार म्हणून जावईबापूंना खायला देत विनोद करत चेष्टामस्करी व आनंदात जेवण करत तो साजरा केला जातो.
अशी या धोंड्याच्या महिन्यात विशेषता ग्रामीण भागात अशी प्रथा आहे. अनेक श्रद्धाळू या अधिक महिन्यात तीर्थयात्रा, देवदर्शन तसेच तीर्थस्नान, पवित्र नद्यांमध्ये, संगमामध्ये स्नान करून पूजा-अर्चा करत असतात. त्यामुळे अशा अधिक महिन्यात नेहमी तीर्थस्थानच्या ठिकाणी, तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी, पवित्र नद्यांच्या, संगमवर भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळत असते. मात्र यावर्षी कोरोनामुळे सर्वकाही सण ,उत्सव, यात्रा साधेपणाने साजरे होत आहे.
यावर्षी कोणत्याही जावायाला नाही धोंडा व कोणत्याही श्रध्दाळू नची कोणत्या तीर्थस्थानाला नाही भेट, कारण सर्व देवस्थाने आता भाविकाना दर्शनासाठी बंद आहेत. त्यामुळे कोरोणामुळे या वर्षी आलेल्या अधिक महिन्यात देवदर्शन, तीर्थयात्रा, गंगास्नान तसेच जावयासाठी गोडधोड जेवण हे सर्व बंद आहे. कोणीही कोरोणामुळे एकमेकाकडे जाण्यास सहजासहजी तयार होत नाही. त्यामुळे या वर्षीचा हा धार्मिक असा अधिक मास इतर सण ,उत्सव या प्रमाणे शांत शांत जाणार आहे. मात्र त्यामुळे नुकतेच विवाह झालेल्या जावईबापूंना मात्र सासरच्या या धोंड्याच्या महिन्यातल्या आनंदा पासून वंचित राहावे लागणारआहे .
धोंड्याचा हा महिना म्हटला की सर्वत्र धार्मिक वातावरण असते. मात्र यावर्षी कोरेणामुळे ते कुठेही दिसून येत नाही. तरीही अनेक श्रद्धाळू हा अधिक मास आपापल्या घरात पूजाअर्चा करून मनोभावे साजरा करताना दिसून येत आहे. या धोंड्याच्या महिन्यात वेगवेगळ्या प्रकारचे दान केले जाते. या महिन्यात दानाला खूप महत्व असते. मात्र कोरोनामुळे कोणी दान करायला व दान घ्यायलाही कुणी लवकर पुढे येत नाही. अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. असे चित्र सध्या शहरातच नव्हे तर ग्रामीण भागातही दिसून येत आहे.

