shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

जिल्ह्यात इंदापूर तालुक्याची कोविड काळातील ऑनलाईन शैक्षणिक कार्य अव्वल...इंदापूर पंचायत समितीच्या वतीने शिक्षकांचा सन्मान...!!


इंदापूर ‌।प्रतिनिधी: तात्याराम पवार
इंदापूर दि१९/०९/२०२० रोजी इंदापूर पंचायत समितीच्या वतीने सध्या कोरणा विषाणूजन्य परिस्थितीत जागतिक महामारी मूळे देशात सध्या सर्व शाळा बंद आहेत अशा परिस्थितीमध्ये विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण प्रणालीद्वारे मोफत शिक्षण अँड्रॉइड मोबाइल द्वारे देण्याची संकल्पना जिल्ह्यामध्ये जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी मांडलेल्या संकल्पनेला इंदापूर पंचायत समितीच्या वतीने सभापती, उपसभापती ,पंचायत समिती सदस्य ,गट विकास अधिकारी गट शिक्षण अधिकारी व त्यांचे सर्व शिक्षक यांच्याद्वारे तालुक्यातील विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक प्रगती घडवून आणल्याचे दिसत आहे.



शिक्षकांना ऑनलाईन प्रमाणपत्र पाठवत असताना उपसभापती संजय देहाडे यांचे छायाचित्र


या काळात ज्या शिक्षकांनी विशेष कार्य करून दाखवले त्यांचा ऑनलाइन प्रशस्तीपत्रक देऊन  सन्मान करण्यात आला Covid -19 च्या  प्रादुर्भावामुळे देशातील शाळा चार महिन्यापासून बंद आहेत शिक्षकांनी मात्र विद्यार्थ्या पर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करत स्वतःमध्ये तंत्रज्ञान विषयक खूप बदल घडवून आणलेला दिसत आहे पूर्ण जिल्ह्यातील इंदापूर तालुक्याचे काम संपूर्ण जिल्ह्यात अतिशय गौरवास्पद आहे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद व गट विकास अधिकारी विजयकुमार परीट गट शिक्षण अधिकारी राजकुमार बामणे यांच्या प्रेरणा व मार्गदर्शनातून इंदापूर तालुक्यात मार्च महिन्यापासून ऑनलाइन टेस्ट शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धा शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती मार्गदर्शन कार्यशाळा विद्यार्थ्यांसाठी एक हजार पेक्षा जास्त शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती  ऑनलाईन स्पर्धा ,साप्ताहिक अभ्यास कृतीपत्रिका ,झूम व गुगल ॲप चे प्रशिक्षण वर्ग ,साप्ताहिक ऑनलाईन टेस्ट इत्यादी उपक्रम यशस्वीपणे राबवले गेले आहेत.


सर्वाधिक व्हिडिओ निर्मिती करणारे इशरत ओमन 80 ज्योती गायकवाड 76 नुसरत सय्यद 76 शुभांगी भांड 58 रत्नमाला सर घुले 53 सुवर्णा ठोंबरे 41 स्वाती लोंढे 39 सीमा लाडगे 32 मनीषा बंड32 ज्योती पवार 30 स्वाती पवार 29 वैजंता घुगे 22 तसेच ऑनलाईन साप्ताहिक अभ्यास वर्ग कृतीपत्रिका व साप्ताहिक ऑनलाइन टेस्ट तयार करणाऱ्या मोमीन मन उद्दीन सूर्यवंशी संभाजी सिंगाडे दत्तात्रेय गायकवाड संभाजी काळे दिनेश थंबद महेश भौंग सतीश काळेल राजेंद्र या शिक्षकांचा प्रशस्तीपत्रक देऊन गुणगौरव करण्यात आले .

शिक्षक दिनानिमित्त विद्यार्थ्यांसाठी विविध ऑनलाइन स्पर्धाचे आयोजन करण्यात आले .यामध्ये वक्तृत्व स्पर्धा ,घोषवाक्य ,प्रेरणा व प्रबोधनात्मक गीत ,वाचन ,नाट्यवाचन पोस्टर इत्यादी स्पर्धा यशस्वी पणे राबवल्या यामध्ये पाचशे विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून 59 विद्यार्थ्यांना प्रशस्तिपत्र देऊन सन्मानित करण्यात आले, थँक टीचर व कोविड योद्धा सन्मान शिक्षकांसाठी ऑनलाइन शिक्षण यशोगाथा या उपक्रमासाठी उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शिक्षकांपैकी मोमीन इशरत शुभांगी वारे यांचा तसेच कोवी ड योद्धा म्हणून ज्योती पवार सुवर्णा ठोंबरे या उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शिक्षकांचे व विद्यार्थ्यांचे पंचायत समिती सभापती सौ पुष्पाताई रेडके उपसभापती संजय देहाडे तसेच सर्व जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती सदस्य यांनी अभिनंदन व कौतुक केले सर्व शिक्षकांना प्रति थँक टीचर ही भावना व्यक्त केली.
close