shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

नगर - सोलापूर महामार्गाची खरी दुरावस्था सा.बां.विभागाच्या टक्केवारी संस्कृती मुळेच ..?


नगर । प्रतिनिधी (शिवा म्हस्के):
नगर -सोलापूर रस्त्याला राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ए ५१६ असा दर्जा मिळुन कित्येक वर्ष झाली, पण या रस्त्याला राष्ट्रीय महामार्ग दर्जा फक्त कागदोपत्रीच आहे. गल्ली बोळातले रस्ते तरी एखादे वेळेस चांगले असतील. पण हा रस्ता त्याहीपेक्षा भयानक व खड्डेमय दिसत आहे. 

"रस्त्यात खड्डा की, खड्ड्यात रस्ता " हे पावसामुळे प्रवासींना कळायला मार्ग नाही.  याला सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, कर्मचारीच जबाबदार आहे..?

या महामार्गाचे देखभाल, दुरुस्ती हि सार्वजनिक बांधकाम विभाग कडे  आहे. हा रस्ता आत्ताच खराब झाला असेही काही नाही. बर्याच कालावधी पासून हा मार्ग सार्वजनिक बांधकाम विभागाच्या व जागतिक बॅंक प्रकल्प विभागाच्या टक्के वारी संस्कृती मुळेच अनेक वर्षांपासून अतिशय खड्डेमय होत आहे. याला जबाबदार कोण? असा सवाल उपस्थित होत आहे.



जिल्हा नियोजन बैठकीमध्ये  या रस्त्याचा विषय आला असता तर आजची हि वेळ आली नसती. 

तिन आमदार एक खासदार यांचे कार्यक्षेत्र असून देखील या कडे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. हे खेदजनक आहे.  या रस्त्यावर हजारो वाहने ये जा करत असतात. यात परराज्यातील वाहनाचा मोठा समावेश आहे. जड वाहतूक हि मोठ्या प्रमाणात होत असते.

नगर-करमाळा -सोलापूर  या रस्त्यावर काही वर्षा पूर्वी वाळुज शिवारात टोल नाका होता. तो पर्यंत हा रस्ता चांगल्या प्रतिचा होता. पण सार्वजनिक बांधकाम विभाग कडे हा रस्ता आल्या‌ पासून या रस्त्याची वाटच लागली. 
" सरकारी काम, बारा महिने थांब" हि म्हण या रस्त्याला शंभर टक्के लागू पडते. नगर पासून रुईछत्तीसी ते घोगरगाव पर्यंत पुढे हि रस्त्याचा एक किलोमीटर सुध्दा रस्ता म्हणून रस्ता  राहिलेला दिसत नाही.पुर्ण पणे या रस्याची चाळण झाली आहे. दोन  तीन फुटा पर्यंत खड्डे पडले आहेत. कोरोना रूग्णांना अत्यावश्यक सेवेतील ॲब्युलन्स मधुन जिल्हा रुग्णालय पर्यत न्यावा लागते. अत्यावश्यक सेवेतील वाहनाचा मिनिटाचा कालावधी हा तासांवर गेला आहे. 

या रस्त्यावर "प्रवास करणं म्हणजे साक्षात मृत्युची घंटा आहे"  अशी लोकांची आता मानसिकता झाली आहे. यात त्या अत्यावश्यक सेवेतील चालक तरी काय करणार...? रस्ताच  खड्डेमय झाला आहे. कार गाडी तर कुठं टेकते, कुठं काय फुटतयं हे समजत नाही.  या रस्त्यावर रोज छोटे मोठे अपघात होऊन मरणालाच आमंत्रण मिळाले आहे. खड्डेमय रस्त्यामुळे भविष्यातही किती लोकांचे प्राण जातील याची कल्पना  न केलेली  बरी..   नगर-सोलापूर रस्त्याची दयनीय अवस्था अजून किती दिवस रहाणार..? याकडे कोणत्या लोकप्रतिनिधी चे लक्ष आहे की नाही. हे भविष्यात कळेलच..?

नागरिकांना पडलेला प्रश्न..
राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण अहमदनगरला करणार का...?

सार्वजनिक बांधकाम विभाग अहमदनगर तसे करणार  का..?

या मार्गाकडे  नगर तालुक्यातील सत्ताधारीं चे लक्ष कितपथ आहे, आणि विरोधी पक्षाचे लक्ष कितपथ आहे. याबद्दल  रस्ता पहाता शंकाच आहे. 

तसेच अरणगाव, वाळुंज, बाहृयवळण रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली आहे.  आत्ताच अरणगांव ते वाळुंज विशेष करून वाळुंज गावाजवळ सिना नदीच्या पुलाजवळ मागे व पुढे बाह्यवळण रोडवर झालेल्या खड्यांमुळे व गाळामुळे एक गाडीचा पाटा तुटला. त्यामुळे 14 टायर गाडी जागेवरच  काहीकाळ उभी राहिली. 

तिच्या मागे एक कार अडकली. एक ट्रेलर खड्यामध्ये चेसिज टेकल्यामुळे टायर फ्री झाल्यामूळे तो ट्रेलरही रोडला उभा राहिला. जवळपास सायंकाळी १० वाजेपर्यंत नादुरुस्त वाहने रस्त्यातच असल्याने वाहतूक जवळपास ठप्पच झाली होती. या रस्त्याकडे आता अधिकारी व लोकप्रतिनिधी लक्ष देतील का..? याकडे  सर्वांचे लक्ष लागून आहे.
close