shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

दिनांक: १७ सप्टेंबर २०२०, दुपारी १२ वाजेपर्यंतचा अहवाल.., आज तब्बल ५७३ रुग्णांना मिळाला रुग्णालयातून डिस्चार्ज..!!

बरे झालेल्या रुग्ण संख्येने ओलांडला २९ हजारांचा टप्पा..

रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८५.६५ टक्के..

आज १४४ बाधितांची रुग्णसंख्येत भर..

अहमदनगर : जिल्ह्यात आज तब्बल ५७३ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २९ हजार ०८५ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८५.६५ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (बुधवारी)  सायंकाळी सहा वाजले पासून आज दुपारी १२ वाजेपर्यंत रूग्ण संख्येत १४४ ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ४३३३ इतकी झाली आहे.

बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ६७, राहाता ०४, पाथर्डी ०२,  नगर ग्रामीण ०४ श्रीरामपूर १५, कॅंटोन्मेंट ०१, नेवासा १९, श्रीगोंदा ०१, पारनेर ०३, अकोले ०१, राहुरी ०९, कोपरगाव ०४,जामखेड ०२, मिलिटरी हॉस्पिटल ११ आणि इतर जिल्हा ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.

दरम्यान, आज ५७३ रुग्णांना  बरे झाल्यामुळे डिस्चार्ज मिळाला. यामध्ये मनपा १६९, संगमनेर ५०, राहाता १९, पाथर्डी १९, नगर ग्रा २५, श्रीरामपूर २६, कॅन्टोन्मेंट ०५, नेवासा ५१, श्रीगोंदा  ४२, पारनेर २८, अकोले १६, राहुरी २३, शेवगाव ४५, कोपरगाव २७, जामखेड ११, कर्जत १६, मिलिटरी हॉस्पिटल ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.

*बरे झालेली रुग्ण संख्या: २९०८५

*उपचार सुरू असलेले रूग्ण:४३३३

*मृत्यू:५३९

*एकूण रूग्ण संख्या:३३९५७

*(स्त्रोत: नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय अहमदनगर)

*STAY HOME STAY SAFE

*प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करा

*स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या

*अधिकृत स्त्रोतांकडून आलेल्या माहितीवरच विश्वास ठेवा

*खोटी माहिती पसरवू नका;पसरू देऊ नका.
close