shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

सेनगांव येथे मटका अड्डयावर धाड;पोलीस उपनिरीक्षक एस.एस.घेवारे यांच्या पथकाची कामगीरी..!!



हिंगोली । प्रतिनीधी(विश्वनाथ देशमुख)
दि.२२,हिंगोली जिल्हयातील सेनगांव शहरातील श्री आप्पास्वामी प्रवेशव्दार कमान जवळ दि.२२ सप्टेबंर मंगळवार रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक एस.एस.घेवारे यांच्या पथकाने मटका अड्डयावर धाड टाकत ३९ हजार ६२० रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे.


सेनगांव शहरात श्री आप्पास्वामी प्रवेशव्दार कमान जवळ मटका चालु असल्याबाबत गोपनीय माहीती मिळाल्यावरुन पोलीस उपनिरीक्षक एस.एस.घेवारे,पोलीस जमादार संभाजी लेकुळे,भगवान आडे,किशोर कातकडे,विठ्ठल काळे,नामदेव जाधव,प्रशांत वाघमारे यांच्या पथकाने मटका अड्डयावर धाड टाकली असता मटका घेणारे आरोपी बाळु बबन उटकर,जावेद खान करीम खान पठाण दोघे ही राहणार सेनगांव,सत्यनारायण जयस्वाल रा.इटोली व ईतर तीन जण यांच्याकडुन रोख रक्कम ३० हजार ६२० रुपये व मोबाईल असा एकुण ३९ हजार ६२० रुपयाचा मुद्देमाल जप्त करुन याप्रकरणी सेनगांव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केल्याची माहीती पोलीस उपनिरीक्षक एस.एस.घेवारे यांनी शिर्डी एक्सप्रेस प्रतिनीधीशी दिली आहे.सदरची कार्यवाही हिंगोली पोलीस अधिक्षक योगेश कुमार,अप्पर पोलीस अधिक्षक यशवंत काळे,पो.नि.दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक एस.एस.घेवारे यांच्या पथकाने केली आहे.
close