shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

सेनगांव शहरातील पशुवैद्यकीय उपकेंद्रास आले तळ्याचे स्वरुप..!!



हिंगोली।प्रतिनीधी:(विश्वनाथ देशमुख)
दि.२२,हिंगोली जिल्हयासह सेनगांव तालुक्यात कोरोना माहामारी नंतर जनावरांवर सुध्दा लंपी स्किनचा आजार आल्याने पशुपालक शेतकरी बांधव चिंताग्रस्त आहेत.सेनगांव शहरातील पशुवैद्यकीय उपकेंद्रात पशुपालक आपल्या जनावरांना उपचारासाठी घेऊन येत आहेत मात्र या ठिकाणी सर्वत्र पाणी साचुन तळ्याचे स्वरुप आले असुन घाणीचे साम्राज्य निर्माण झाल्याने पशुपालक कमालीचे नाराज आहेत.

सध्या कोरोना पाठोपाठ लंपी स्किन आजाराने थैमान घातले असुन पशुपालक शेतकरी आपल्या जनावरांना उपचारासाठी सेनगांव येथील पशुवैद्यकीय उपकेंद्रात मोठ्या संख्येने येत आहेत.उपकेंद्र परीसरात सर्वत्र पाणी साचले असुन घाण पाण्याला दुर्गंधी येत असुन या परीसरात सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे.विशेष म्हणजे या केंद्रात  कोणता ही अधिकारी,डाँक्टर  हजर नसतो हा दवाखाना केवळ एका सेवकावरच चालू  आहे.पाणी साचल्यामुळे जनावरांना व पशुपालकांना सुरक्षित उभे ही राहाता येत नाही.याकडे संबधीत विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसुन येत आहे.संबधीत विभागाने याकडे लक्ष देऊन पशुपालकांचा होणारा त्रास दुर करावा अशी मागणी पशुपालक शेतकरी वर्गातुन होत आहे.
close