shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

गारखेडा परिसरात रहिवाशी भागात वीज कोसळली..!!




प्रतिनिधी । औरंगाबाद :दत्ता जाधव 22 सप्टेंबर 
औरंगाबाद -
आज दि 22/09/20 वार मंगळवार रोजी दुपारी विजांचा कडकडाट सहित पाऊस   सुरु झाला,  शिवाजी नगर गारखेडा परिसर परिसरातील भारत नगर मधे श्री रमेश आनंद बन भारत नगर प्लाॅट नंबर 36 यांचे दोन मजली घराच्या वरच्या मजल्यावर गॅलरीच्या कोपऱ्यावर निसटती विज कोसळली . 
          

रमेश बन हे त्याच परिसरातील असलेल्या दुसऱ्या घरी होते शेजारी काॅलनीमधे राहणारे लोकांनी त्याना फोन करुन‌माहीती दिली कि तुमच्या घरावर विजय पडली ,कोसळली आहे म्हणुन , माहीती मिळताच त्यांना धक्काच बसला नेमके काय? काय ? नुकसान झाले असावे ,त्यांनी प्रत्यक्ष येऊन पाहणी केली असता वरच्या मजल्यावरील गॅलरीच्या कोपऱ्यावर निसटती विज पडली कोपऱ्यातल्या काही विटा ‌अस्त , व्यस्त पडलेल्या होत्या काही खाली व काही वरती डिश ,केबल अॅटिना चे नुकसान व विज मिटर ही बंद पडले , आजुबाजूला राहणारे , नानासाहेब वाहुळयांची टी व्ही व पंखा खराब झाले, कमलबाई रमेश हिवराळे,,कलावती मारोती सातपुते,गणेश ससाणे. खदाने गुरूजी,भसांडे 
 इतरही अनेक नागरीकांचे पंखे,व टिव्ही सेट  खराब झाले . 
        
नेहमी विज ही आकाशात उंचावर कडकडाट करताना पा हीले व ऐकले ,परंतु आज ची घटना ही अतिशय भयानक होती,कारण की या परिसरातील  प्रत्येक नागरिकांना वाटले की आपल्याच घरावर विजय पडल्याचा भास झाला होता ,अवाज व कडकडात ,चकाकी इतकी भितीदायक व धक्कादायक अशीच होती ,दैव नशीब बलवत्तर ,जीवीत हानी टळली आहे.कबल नेटवर्क ,डाव टिव्ही चे व पंखा खर बंद पडल्याचै अनेक नागरिकांनी सांगितले ,मुके,प्राणी ,जनावरे सैरावैरा पळत सुटले ,नंतर लोक,नागरिक रस्त्यावर ,घ्या बाहेर येऊन ,कुठे विज पडली  बघितल्या साठी बाहेर आले होते. 
प्रतिनिधी याच परिसरात राहतात.
close