सावळीविहीर( प्रतिनिधी) :
रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण कर्मवीर भाऊराव पाटील यांची आज 133 वी जयंती राहता तालुक्यातील सावळीविहीर बुद्रुक येथे कोरोणामुळे साध्या पद्धतीने पण उत्साहात साजरी करण्यात आली.
सावळीविहीर बुद्रुक येथील रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल या शाळेमध्ये 22 सप्टेंबर, मंगळवार रोजी सकाळी श्री कर्मवीर भाऊराव पाटील यांचे मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. पुष्पहार व पुष्पगुच्छ वाहण्यात आली. सध्या कोरोणाचा काळ सुरू असल्यामुळे हा कार्यक्रम साध्या पद्धतीने घेण्यात आला. दरवर्षी येथे कर्मवीर जयंती निमित्त या शाळेतील विद्यार्थ्यी कर्मवीरआंण्णा्च्या प्रतिमेची भव्य मिरवणूक गावातुन काढली जाते असते तसेच शाळेतही विविध कार्यक्रम घेण्यात येतात.
जयंती निमित्त दरवर्षी विविध स्पर्धाही घेण्यात येत असतात. मात्र यावर्षी कोरोनाच्या संकटामुळे शाळा बंद आहे ,विद्यार्थी नाहीत. मिरवणुकीला परवानगी नाही. त्यामुळे हा कार्यक्रम शाळेत गर्दी न करता मोजक्या लोकांच्या उपस्थितीत घेण्यात आला. कर्मवीर भाऊराव पाटील यांचा जन्म 22 सप्टेंबर 1987 रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील कुंभोज या गावी झाला होता. आज त्यांची 133 वी पुण्यतिथी आहे .भारत सरकारने त्यांना 1959 मध्ये पद्मभूषण हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले होते.कर्मवीर अण्णांचे महाराष्ट्रासह शेजारच्या राज्यातही मोठे कार्य आहे.
त्यांनी रयत शिक्षण संस्थेच्या स्थापना करून आज तिचा विस्तार मोठ्या प्रमाणात झाला आहे, आशिया खंडात सर्वात मोठी शैक्षणिक संस्था रयत शिक्षण संस्था समजली जाते, अशा या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कर्मवीर भाऊराव पाटील यांनी गोरगरिबांना शिक्षण मिळावे. सर्वसामान्य व तळागळातील कुटुंबातील मुलांना शिक्षित होऊन त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी त्यांनी मोठे प्रयत्न केले, त्यांनी कमवा व शिका योजना आणली.अशा कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त त्यांना सावळी बुद्रुक येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये आज मंगळवारी पुष्पहार व पूजन करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी न्यू इंग्लिश स्कूल शाळेचे व्यवस्थापक कमिटीचे बाळासाहेब जनार्धन जपे, गणेश कापसे ,विकास जपे, सुनील रामनाथ जपे, सोनवणे,जपे , शाळेचे मुख्याध्यापक राऊत सर, आदी उपस्थित होते. सावळीविहीर प्रमाणेच राहता तालुक्यात विविध ठिकाणी रयत शिक्षण संस्थेच्या शाळा असून कोरोनामुळे कोणताही कार्यक्रम जाहीर न घेता किंवा मोठ्या प्रमाणात न घेता साध्या पद्धतीने ही कर्मवीर अण्णांची 133 जयंती यावर्षी सर्वत्र साधेपणाने पण उत्साहात साजरी करण्यात आली. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांनीही आपापल्या घरातूनच मोबाईलवर सोशल मीडिया मध्ये एकमेकांना शुभेच्छा देत ही जयंती साजरी केली.

