प्रतिनिधी । शिवा म्हस्के
रूईछत्तीसी :- नगर तालुक्यातील जनता कला व विज्ञान महाविद्यालय रुईछत्तीसी येथील महाविद्यालयात अंतीम वर्षाच्या परीक्षेची तयारी झाली आहे.ऑनलाईन परीक्षा देणारे विद्यार्थी ५० व ऑफलाईन परीक्षा देणारे विद्यार्थी १२५ आहेत. एकुण विद्यार्थी १७५ आहेत.यात जास्त ऑफलाईन विद्यार्थी जास्त आहेत.ग्रामीण भागात सर्व सुविधा उपलब्ध नसल्याने नेटवर्क गायब होणे, लाईट जाणे. अशा अनेक अडचणी असल्या मुळे जास्त विद्यार्थी चा कल ऑफलाईन चा पर्याय निवडला आहे.
विद्यापिठाच्या परीक्षा दि.१आक्टोबर ते ९ ऑक्टोबर दरम्यान विषय राहिलेले आहे असे विद्यार्थी १०ऑक्टोबर ते ३० ऑक्टोबर दरम्यान रेग्युलर परीक्षा होणार आहे.त्यांचे वेळापत्रक विद्यापीठच्या वेबसाईट उपलब्ध झालेले आहे. कोरोना ची खबरदारी साठी विद्यार्थी परीक्षा ला बसताना मास्क घालने बंधनकारक आहे.पेपर झाल्या नंतर प्रत्येक वर्ग निर्जंतुक करणे. प्रत्येक वर्गा च्या बाहेर सिनिटायझर ची व्यवस्था, हात धुण्यासाठी साबण , पाणी अशी सर्व व्यवस्था झाली आहे. जिल्हाधिकारी यांचे आदेश व आरोग्य विभाग मार्गदर्शन सुचनांचे पालन करणे.परिक्षेची सर्व तयारी झाली आहे.अशी माहिती जनता महाविद्यालय प्राचार्य डॉ.सुरेश बाबर यांनी दिली. ज्या विद्यार्थ्यांना प्रथम वर्षाला कला विज्ञान शाखेत प्रवेश घ्यावयाचा बाकी आहे,अशा विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर प्रवेश निश्चित करावा असे आव्हान काॅलेज प्रशासनाने केले आहे.
राज्यसरकारने पदवीच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना पूर्वीप्रमाणेच पदवीचे प्रमाणपत्र मिळणार आहे. याबाबत विद्यार्थ्यांनी कसलाही संभ्रम निर्माण करून घेऊ नये, असे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत म्हणाले, अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेबाबत विद्यापीठाने विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करून तयारी केली आहे. विशेषतः विद्यार्थ्यांच्या आरोग्याची पूर्णपणे काळजी घेऊन परीक्षा प्रक्रिया पार पाडण्यात येणार आहे. पदवीच्या प्रमाणपत्रावर कोविड–१९ च्या संदर्भाने काहीही उल्लेख नसेल. गतवर्षीप्रमाणे यावर्षीही पदवी प्रमाणपत्र देण्यात येईल, त्यामध्ये काहीही बदल असणार नाही.असे स्पष्ट करण्यात आले आहे.

