shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

संकटात सापडलेल्या गरीब मुस्लिम कुटुंबाला आर्थिक मदत करण्यासाठी आव्हान..!!

केज / जिल्हा प्रतिनिधी ( प्रकाश मुंडे):- 
नांदुर घाट येथील मोलमजुरी ( पान टपरी ) करून उदरनिर्वाह भागवणारा राजू शेख यास दिनांक 13/ 09 / 20 रोजी घरा शेजारी परुड जातीचा साप चावला तीन दिवस शासकीय रुग्णालयात उपचार केला परंतु हात सुजू लागला व विष चडू लागले  म्हणून ऑपरेशन करणे जरुरीचे होते प्रायव्हेट मध्ये ऍडमिट केले आजपर्यंत जवळपास 70 हजार खर्च झाला आहे. 


राजू मजुरी करतो त्याच्या कुटुंबातील आई पत्नी मागील तीन दिवसापासून रडू लागले आर्थिक स्त्रोत नाही . त्याचा जीव वाचणे महत्त्वाचे होते. परुड या विषारी साप चावला उपचार होणे गरजेचे होते त्याचा जीव वाचला तो ऍडमिट आहे . 

मेडिसिन व ऑपरेशन याचा खर्च जवळपास 70 हजार रुपये झाला अशावेळी नांदुर घाट मध्ये व दानशूर व्यक्तीने पुढे येणे गरजेचे आहे तुम्ही दिलेले 100 200 500 ही मदत राजूचा जीव वाचवेल.
 
व नांदूर घाट हे दानशूर आहे. प्रत्येकाच्या सुखदुःखात हिंदू असो या मुस्लिम एकत्र येतात व सलोखा वाढतो प्रत्येकाने पुढे येणे गरजेचे आहे . नांदुर घाट मध्ये या पाठीमागे देखील खुप जणांच्या दुःखात प्रत्येक जण सक्षम उभारायला व मदत केली तसेच राजू शेख याला सढळ हाताने मदत करा. असे आवाहन अमोल जाधव (पत्रकार नांदूर घाट) व सदरील गरीब कुटुंबातील व्यक्तींनी केले आहे. 

१ ) अमोल जाधव ( पत्रकार ) - ५०० 
२) राजाभाऊ मुंडे    - १०००
३) रोफ शेख   - ५००
४) संजय नवले - १०००
५) दिगंबर सुरवसे ३०० यांनी मदत केली आहे. आपणही माणुसकीच्या नात्याने या गरिब मुस्लिम युवकास मदत करावी व आपल्या केज तालुक्यातील गरज वंतांना मदत करणारा तालुका हा नावलौकिक कायम ठेवला जावा.  

***  धर्म कोणताही असो गरजूंना मदत करणारा तालुका म्हणून केज तालुक्याचा नेहमीच उल्लेख केला जातो हे विषेश.  ***

अमोल जाधव हे नेहमीच गरजूंना मदत करण्यासाठी धडपड करीत असतात. सदरील मदत करण्यासाठी अमोल जाधव पत्रकार यांचे फोन पे व गुगल पे फोन नंबर दिले आहेत. 
 
मोबाईल क्रमांक   ----
९८२३५४४९११
फोन पे 
गुगल पे.
close