shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

सततच्या पावसाने उभ्या सोयाबीन पिकाला फुटले अंकुर,सेनगांव तालुक्यातील शेतकरी वैतागला..!!

हिंगोली/प्रतिनीधी(विश्वनाथ देशमुख)
दि.१९,हिंगोली जिल्ह्यातील सेनगांव तालुक्यात सोयाबीन पेरणी नंतर बियाणे ऊगवलेच नाही दुबार पेरणी,तीबार पेरणी नंतर ज्या काही सोयाबीन ऊगवल्या त्यावर विविध रोगाचा प्रादुर्भाव आल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहें उडीद,मूग ह्या पिकाला देखील अंकुर येऊन पावसा मुळे जागीच सडून गेले आत्ता तर उभ्या हिरव्या सोयाबीनच्या  पिकाला अंकुर फुडले आहेत या बाबत तालुका कृषी विभाग सेनगाव आणि महसूल विभागाने तात्काळ पंचनामे करावे अशी मागणी रासप चे  कार्यकर्ते संतोष हराळ यांनी केली आहे. 

सेनगांव तालुक्यात गेल्या आठ दिवसा पासून सततच्या पावसामुळे मूग,उडीदाची वाट लागली मात्र नुकसानग्रस्त मूग,उडीदाचे पीक शासनाच्या निकषामध्ये बसले नसल्याने अनेक शेतकरी मदती पासून वंचित राहीले आहेत आत्ता शेतकऱ्यांची बहरलेली सोयाबीन पीक होते मात्र जास्त पावसामुळे हाताशी आलेल्या सोयाबीन मध्ये उभ्या पीकातुण अंकुर फुटत आहेत सततच्या पावसामुळे सोयाबीन पिकाला हि मोठा फटका बसला आहे शेतातील उभे सोयाबीन अंकुरत असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.सेनगाव तालुक्यातील साखरा,हत्ता,कापडशिंगि,केलसूला या मंडळातील अनेक शेतकरी या समस्येला वैतागले आहेत. या पिकाची महसूल विभागाणे तात्काळ पंचनामे करावे अशी मागणी रासप कार्यकर्ते संतोष हराळ यांनी केली आहें 

तालुक्यातील ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरला आहें त्यांनी आपल्या मोबाईल वरून ऑनलाईन तक्रार करायची तक्रार पुढील प्रमाने करायची आहें सर्व शेतकरी बंधूंनी खरीप 2020/2021साली  चा पीक विमा काढला आहें त्यांनी क्रॉप  इन्शुअरन्स अप गुगल pay स्टोर वरून आपल्या फ़ोन मध्ये इन्स्टॉल करून नुकसानीचा सूचना फॉर्म भरने त्यावर नुकसान कश्या प्रकारे जाले हि माहिती भरने  किंवा 18002660700 या नंबर वर पण फ़ोन लाऊन तक्रार नोंदवू शकता असे आव्हान सेनगाव तालुका कृषी विभाग यांच्या कडून करण्यात आले आहे.

या सर्व भागातील पिकांचे पंचनामे करण्यासाठी राष्ट्रवादी काँगेसचे प्रदेश सचिव परमेश्वर इंगोले यांनी हिंगोली जिल्हाधिकारी,पालकमंत्री,तहसीलदार,कृषी विभाग यांना वारंवार निवेदन दिले आहे मात्र अद्याप हि नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे झाले नाहीत. 

प्रतिक्रिया 
शेतातील उभ्या असलेल्या सोयाबीन पिकाच्या शेंगा सततच्या पावसाने अंकुरलेल्या सोयाबीन दिसत आहेत यामुळे सोयाबीन पिकाच्या उत्पादनात मोठी घट होणार आहें यांचे संबंधित विभागाने तात्काळ पंचनामे करावे.
रासप कार्यकर्ते संतोष हराळ मु .कापडशिंगि .ता .सेनगाव जिल्हा हिंगोली
close