shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

भोडणी येथील पूल व रस्त्यांची जोरदार पावसामुळे दुरावस्था...अंकिता ताई पाटील यांनी केली पाहणी..!!

इंदापूर । प्रतिनिधी (तात्याराम पवार)➤
भोडणी दि.१९/०९/२०२० काल सायंकाळी  भोडणी परिसरात जोरदार पाऊस झाला असल्याने खटके वस्ती, शिंदे वस्ती व देवकर वस्तीला जोडणारे 3 पुल - रस्ते पाऊसामुळे वाहून गेले आहेत. सदर ठिकाणी बावडा लाखेवाडी जिल्हा परिषद गटाच्या सदस्या अंकिता ताई पाटील यांनी प्रत्यक्ष भेट दिली व सदर नुकसानीची पाहणी केली .

यावेळी अंकिता ताई पाटील यांनी सांगितले की आजकाल सायंकाळी तालुक्यामध्ये ठिक-ठिकाणी जोरदार मुसळधार पाऊस झाला. या मुसळधार पावसामुळे अनेक पिकांचे नुकसान झाले आहे व रस्ते वाहून गेले आहेत. भोडणी गावातील खटके वस्ती, शिंदे वस्ती व देवकर वस्तीला जोडणारे 3 पुल - रस्ते पाऊसामुळे वाहून गेले आहेत. आज तेथे जाऊन पहाणी केली व प्रशासनास हे पूल दुरूस्त करून द्यावे असे आदेश दिले. यावेळी सदर ठिकाणी पाहणी करताना आजी-माजी सरपंच, ग्रामविकास अधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
close