shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

रात्री बेरात्री वीज जाण्यामुळे परिसरातील ग्रामस्थ हैराण वीज पुरवठा सुरळीत करण्याची मागणी...!!

अलिबाग वार्ताहर। मिलिंद पाटील सारळ
माहाराष्ट्र राज्य वीजवितरणचे आवास येथे कार्यरत झालेले सबस्टेशनमुळे परिसरात सर्व ठीकठाक होऊन चांगली विदुयतसेवा मिळेल हि सामान्य ग्रामस्थांनची आशा गेल्या महिन्याभरा पासून वीज गायब होण्याच्या प्रमाणात अचानक वाढ होत झाल्याने संपत चालली आहे. सारळ, रेवस, नवखार, कोप्रोली परिसरातील ग्रामस्थ विजेच्या वारंवार गायब होण्याच्या या प्रकारामुळे हैराण झाले आहेत. एका बाजूला येत असलेल्या प्रत्येक वीज बिलात भरमसाठ वाढ दुसऱ्या बाजूला दिवसातून बराच कालावधी वीज गायब असणे यामुळे ग्रामस्थांची विजेवर अवलंबून असणाऱ्या सर्वच कामांचा बोजावारा उडत आहे.

 नित्यनियमाने विजेच्या गायब होणाच्या कारणाबाबत ग्रामस्थांना माहिती न मिळाल्याने हे सर्व स्थानिक पातळीवर होत आहे कि वरच्या पातळीवर कुठेतरी झालेला बिघाड मिळत नाही या बाबत अनभिज्ञ आहेत, स्थिर वीज मिळण्यासाठी आता कोरोना काळात आंदोलन करावे लागणार का असा प्रश्न येथील स्थानिक ग्रामस्थ विचारत आहेत. वातावरणातील बदलामुळे गर्मीत वाढ होत असल्याने वीज नसल्याचा त्रास महिलावर्ग, लहान मुले,  जेष्ट नागरिक यांना जास्त प्रमाणात होत आहे. रात्री बेरात्री लाईट गायब झाल्याने झोपमोड होणे, चीड चीड वाढणे यामुळे मोठ्या कटुंबातून कारण नसताना वाद वाढत असल्याची स्थिती गावामधून दिसून येत आहे. 

सप्टेंबरच्या शेवटी अनेक विद्यार्थीवर्गाच्या शाळा, परीक्षा यांचे वेळापत्रक असल्याने त्यातहि हे सर्व ऑनलाईन होणार असल्याने त्याची पूर्वतयारी करण्यासाठी लाईट गायब होण्यामुळे विद्यार्थीवर्गाचे नुकसान होत आहे. लाईट आणि नेटवर्क ह्या दोन्ही गोष्टी एकमेकाला पूरक असल्याने तीच स्थिती ऑनलाईन काम करणार्याची होत आहे, लाईट चे गायब असणे वाढल्यामुळे इन्व्हर्टर असण्याऱ्या घरी हि तो व्यवस्थित चार्ज न झाल्याने त्यात बिघाड होण्याचे प्रमाण वाढले आहे. जीवनप्रधिकरण चे पेयजल हि या लाईट विश्वाच्या संबधित असल्याने याचा परिणाम पिण्याच्या पाणीपुरवठ्यावर होत आहे. माहाराष्ट्र राज्य वीजवितरणच्या अधिकारी वर्गाने परिसरातील ग्रामस्थांच्या संतापाचा  उद्रेक  होण्याअगोदर या समस्येवर मार्ग काढून या परिसराला नियमित वीज पुरवठा करावा अशी मागणी सर्वच ग्रामस्थांनी केली आहे.      
close