shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

सुदृढ शरीर आणि खंबीर मन हेच कोरोनाला हरवू शकते.. डॉक्टर लक्ष्मण आसबे..!!


इंदापूर । प्रतिनिधी (तात्याराम पवार)➤
बावडा दि.१३/०९/२०२० रोजी बावडा येथील कामधेनु  सेवा परिवार चे अध्यक्ष  डॉक्टर श्री लक्ष्मण असबे यांनी सध्या चालू असलेल्या कोरोना संकटा वरती सुदृढ शरीर आणि खंबीर मन हेच सर्वात मोठे शस्त्र आहे आणि हेच कोरोनाला हरवू शकते असे उद्गार काढले ते पुढे म्हणाले की माकडीन तिच्या पिलाला पोटाशी धरून जपत असते, पण स्वतः पाण्यात बुडायची वेळ आली की तेच पिलू आपल्या पायाशी दाबून स्वतःचा जीव वाचविते. आज कोरोनाच्या महामारीत जवळजवळ हीच परस्थिती सगळीकडे दिसत आहे. 

ज्यांच्यावर जबाबदारी आहे आणि ज्यांच्याकडून मदतीची अपेक्षा आहे अशा सर्व घटकांनी माकडणीची भूमीका घेतली आहे.

आपला जीव धोक्यात आला की मानवतेच्या सर्व सीमा पार होतात आणि माणूस अमानवी वृत्ती धारण करतो संवेदना संपलेली माणसे राक्षसापेक्षा भयानक असतात, रोगापेक्षा रोग्याला येणारा हा अनुभव जास्त भयानक आहे.दाद मागायला जागा नाही , तक्रार करायला भरवस्याची व्यक्ती  दिसेनासी झालेली आहे , मदत मागायला समोर सर्व कंगाल दिसत आहेत आणि आपली हाक ऐकणारे कान ठार बहिरे झालेले आहेत ,माणसे फक्त वेडी व्हायची बाकी राहिलेली आहेत आणि या संकटाचा शेवटदृष्टीपथास पडताना दिसत नाही आपल्या आयुष्यातील सर्वात भयानक काळातून आपण चाललेलो आहोत. मीच मला स्वतःलाआणि माझ्या कुटुंबाला वाचवू शकतो !
 
हे सत्य स्वीकारले पाहिजे आणि स्वतः कंबर बांधून खंबीरपणे या महामारीचा सामना करायला हवा नियमित व्यायाम , प्राणायाम, योग्य आणि पौष्टिक आहार, 
पुरेशी झोप हे शरीरासाठी. याला आता कोणताच पर्याय उरलेला नाही आणि तो शोधूही नका.सुदृढ शरीर आणि खंबीर मन हेच सर्वात मोठे शस्त्र आहे आणि हेच कोरोनाला हरवू शकते . आपण अस्तिक असा अथवा नास्तिक, मनाला खंबीर बनविण्यासाठी अध्यात्म सोडून दुसरे मार्ग कुचकामी ठरतात. इतर मार्गाने मनोरंजन होईल पण ते खंबीर होईलच याची खात्री नाही. ध्यान, साधना, मेडिटेशन, जप यापैकी काहीतरी नित्य नेमाने करायची गरज आहे .
  
आज कोरोना रोगापेक्षा त्या रोगाच्या भीतीने_ जास्त माणसे दगावत आहेत आणि भीतीला जगात कोणतेही औषध नाही. यावर मात करायची ठरविली तर 
  _mind/मनच खंबीर बनवावे लागेल_.मागणी वाढली आणि पुरवठा कमी पडू लागला की काळाबाजार सुरू होतो, हे काळाबाजार करणारे कधीच सापडत नाहीत कारण यांनी सर्व यंत्रणा पोखरलेली असते आणि यात बहुतेकांचे हात डागाळलेले असतात .यंत्रणा अपूरी पडू लागली की अपेक्षा वाढतात, त्यामुळे चांगले काम करणारी माणसेही हतबल होतात. ती ही माणसेच आहेत आपण सतत आरोप करण्यापेक्षा त्यांना समजून घ्यायला हवे आणि त्यांना सर्वोतोपरी सहकार्य करायला हवे,  ही काळाची गरज आहे .सुदृढ शरीर आणि खंबीर मन ही आपली वैयक्तिदक जबाबदारी आहे आणि यात प्रामाणिकपणे सेवा देणाऱ्यास सर्वोतोपरी सहकार्य करणे ही आपली सामाजिक आणि राष्ट्रीय जबाबदारी आहे, किमान आजतरी यातली कोणतीच जबाबदारी टाळू नका. असे डॉक्टर असबे यांनी आपले मत व्यक्त केले
close