इंदापूर देि.१३/०९/२०२० इंदापूर येथे आज कर्मयोगी शंकराव पाटील यांच्या चौदाव्या पुण्यस्मरण दिनानिमित्त नीरा-भीमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक श्री राजवर्धन पाटील यांनी भावपूर्ण अभिवादन केले
यावेळी त्यांनी मनोगत व्यक्त केले की इंदापूर तालुक्याचे शिल्पकार व कर्मयोगी परिवाराची जनक, सहकार कारखानदारीच्या माध्यमातून सामान्य गोरगरीब शेतकर्यांच्या घरात ज्ञान व समृद्धीची गंगा आणणारे माजी संसद सदस्य ऋषि तुल्य कर्मयोगी शंकररावजी पाटील भाऊ (आजोबा) यांच्या 14 व्या पुण्यतिथीनिमित्त इंदापूर येथील त्यांच्या समाधी स्थळी जाऊन अभिवादन केले व दर्शन घेतले.
आज आदरणीय श्रद्धेय कै. शंकररावजी (भाऊ )पाटील यांच्या पुण्यतिथीचा दिवस व १४ वे पुण्यस्मरण. इंदापूर कॉलेजमध्ये कर्मयोगी भाऊंच्या समाधी दर्शनासाठी गेल्यावर मला एका अनोख्या सामाजिक राजकीय व्यक्तिमत्त्वची नेहमीच वेगळी अनुभूती लाभते. कर्मयोगी भाऊ (आजोबा) हे माझ्यासाठी नेहमीच हा एक विचार, एक शुद्ध आचार, एक प्रेरणाशक्ती, दिव्यत्वाची अनुभूती आणि समाजाप्रति असणारी जाणीव आणि जागृती आहे. आज मी जेव्हा तालुक्यामध्ये सामाजिक बांधिलकी जपत सामाजिक कार्य करत असताना कर्मयीगी भाऊ आजोबांच्या संपर्कात आलेल्या कुळात आपला जन्म झाला याचे समाधान आणि अभिमान वाटतो. आदरणीय कर्मयोगी भाऊंना शत शत नमन करून कर्मयोगीच्या विचाराचे बंधन बांधून आज मी कृतकृत्य झालो. आजोबा आपणास मनोभावे आदरांजली

