shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

आरोग्य विभागात काम करणाऱ्या सर्वानाच विमा संरक्षण व मोफत आरोग्य विमा मिळावा..!! डॉ. वासुदेव नेहरकर (जिल्हाध्यक्ष भाजप वैद्यकीय आघाडी बीड)

केज  / तालुका प्रतिनिधी ( प्रकाश मुंडे) :-  कोव्हीड योध्दे म्हणून कोरोनाच्या संकट काळात आपला जीव धोक्यात घालून आरोग्य विभागात काम करणाऱ्या शासकीय, खाजगी अधिकारी, कर्मचारी व कंत्राटी कर्मचारी तसेच कामगार हे आपला जीव धोक्यात घालून २४ तास आरोग्य विभागात काम करत आहेत. 


परंतु शासनाने त्यांना विमा नाकारल्याचे निदर्शनास आल्यामुळे त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा चालयचा हा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. तरी शासनस्तरावर याचा निर्णय होऊन विमा संरक्षण लागू होणे अत्यंत महत्त्वाचे झाले आहे. आरोग्य विभागातील सर्वच काम करणाऱ्या लोकांना मोफत आरोग्य सुविधा मिळणे देखील तेवढेच आवश्यक झाले आहे. या सर्व बाबी वर शासनाने तत्काळ प्रभावी निर्णय घेऊन अमलबजावणी करणे आवश्यक आहे. बीड जिल्हा वैद्यकीय आघाडीचे जिल्हाध्यक्ष डॉ. वासुदेव नेहरकर यांनी या बाबतीत निवेदन देऊन तात्काळ निर्णय घेतला जावा अशी मागणी केली आहे. कोरोनाने आतापर्यंत १४७ डाॅक्टरांचा जीव घेतला आहे परंतु शासनाने त्यांना विमा संरक्षण न दिल्याने त्यांच्या कुटुंबापूढे गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे हे विषेश.शासनाच्या आदेशानुसार खाजगी डॉक्टर स्वतःचे हॉस्पिटल DCHC सेंटर म्हणून कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी दिलेले आहेत खाजगी दवाखान्यातील आरोग्य कर्मचारी, अशा ताई , आरोग्य सेवक, अंगणवाडी सेविका,मदतनीस, NHM मधील सर्व कर्मचारी हे अहोरात्र कोरोना महामारी रोखण्यासाठी कार्यरत आहेत परंतु शासन त्यांना विमा तर सोडा पण त्यांच्या हक्काच्या पगारी पण वेळेवर होत नाहीत. त्यांच्या कुटुंबियातील कोणी व्यक्ती आजारी पडल्यास त्याला मोफत उपचार पण मिळत नाहीत. त्यामुळं ते जीव मुठीत धरून काम करत आहेत . तरी शासनाने आरोग्य विभागातील शासकीय,कंत्राटी व खाजगी कर्मचाऱ्यांचा विमा संरक्षण करावा व त्यांच्या कुटुंबातील लोकांना मोफत आरोग्य सुविधा देण्यात याव्यात अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे वैद्यकीय आघाडीचे जिल्हाध्यक्ष डॉ वासुदेव नेहरकर यांनी केली आहे.
close