shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

मानेवाडी येथे ग्राम पंचायतीच्या हालगर्जी पणामुळे गटारीचे पाणी रस्त्यावर..!!



"उपाययोजना करण्याची गरज"

नळदुर्ग (सचिन येडगे)
तुळजापुर तालुक्यातील मौजे मानेवाडी येथे पाऊस पडल्या मुळे  गटारीचे पाणी रस्त्यावर व  नागरिकांच्या घरात पाणी गेल्याने त्यांचे खूप हाल होत आहे. त्यामुळे घाणीचे साम्राज्य निर्माण झाले, याबाबत  सविस्तर वृत्त असे की १३/२/२०२० रोजी विस्ताराधिकारी के.बी. भांगे साहेब यांनी मौजे मानेवाडी येथे गटार संदर्भात पाहणी केली होती. सरपंच यांना गावातील सर्व नाली साफ करून घेण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र काही ठिकाणी काढण्यात आले. अन्य ठिकाणी तसेच राहिल्यामुळे आज पडल्या पाऊसामुळे नालीचे सर्व पाणी रस्त्यावर आले. 

आणि काहीच्या घरात शिरले. या गटारीच्या पाण्याची विलेवाट लावण्यात यावी, अद्याप तरी विद्युत बल्ब बसवले गेले नाही.  प्रशासनाचा हलगर्जी पणा आहे की, आणखीन काय असा प्रश्न निर्माण होतोय? होत असल्याचे नागरिकांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.कारण घाणीमुळे नळदुर्ग येथे एकाच घरातील दोन व्यक्तीना डेंग्यूचे लागण झाली होती. त्यामुळे गावात ही घाणीचे साम्राज्य निर्माण झाल्याने डेंगुसारख्या अनेक रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होऊ शकतो. त्यामुळे ग्राम पंचायत व सरपंच यांनी तात्काळ उपाय योजना करण्याची गरज आहे.
close