shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

बाभूळगाव येथे शिवकृपा मेन्स पार्लर चे उद्घाटन..अमोलराजे इंगळे यांच्या हस्ते..!!


इंदापूर । प्रतिनिधी (तात्याराम पवार)
बाभूळगाव दि.२१/०९/२०२० रोजी बाभुळगाव येथील युवक वैभव नागनाथ गाडेकर यांनी नवीनच शिवकृपा मेन्स पार्लर या व्यवसायाचे भाजप युवा नेते व सामाजिक कार्यकर्ते अमोलराजे इंगळे यांच्या शुभहस्ते उद्घाटन केले.


यावेळी अमोल राजे इंगळे म्हणाले की बाभूळगाव येथील आमचे युवक मित्र वैभव गाडेकर यांनी इयत्ता दहावी पास झाल्यानंतर वडिलोपार्जित व्यवसाय वडिलांच्या बरोबर सराव करून पूर्ण केले .  या अनुभव बरोबर समाजामध्ये सामाजिक व व्यवहारिक ज्ञान घेऊन लोकांबरोबर आपुलकीचं नातं कसं जपावं हे उत्तम उदाहरण म्हणजे वैभव गाडेकर त्यांचा कष्टाळू व मनमिळावू स्वभाव हाच त्यांच्या या व्यवसायाचे प्रगतीचे सूत्र ठरणार आहे .सध्याच्या काळात नोकरीपेक्षा व्यवसाय हा आपल्या जीवनातील प्रगतीचा खरा मार्ग आहे .त्यामुळे युवकांनी नोकरीपेक्षा व्यवसायामध्ये राहून प्रगती करावी. यावेळी या कार्यक्रमास माजी सरपंच दादासाहेब यादव, विठ्ठल अण्णा मोरे, पै अनिकेत जाधव, संदीप जगताप ,नागनाथ गाडेकर ,अल्ताफ शेख ,सचिन जगताप ,गणेश चव्हाण ,सुजित देवकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
close