shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

कासोदा येथील सैय्यद फाउंडेशन तर्फे रक्‍तदान शिबीर..!!

कासोदा  ता, एरंडोल (प्रतिनिधी)
मोहरम  निमित्ताने ना ,ताजिया ना ,सवाऱ्या  ना ,ढोल ना ,बाजा ना गाजा तसेच सादिक शाह हुसैनी सरकार यांच्या उर्स निमित्ताने  मुस्लिम युवकांनी शांततेने लॉक डाऊन  च्या पार्श्वभूमीवर सुरक्षित अंतर ठेवून रक्तदान केले
रक्तदान शिबिराला रेड प्लस बँक जळगाव हुसैनी सेना चे  जळगाव जिल्हा अध्यक्ष फिरोज शेख व ॲडव्होकेट सलीम आय शेख लॅब टेक्निशन शाहिद मुल्लाजी 
यांनी अमोल सहकार्य केले.

एकूण 42 मुस्लिम युवकांनी रक्तदान केले रक्तदान करणारे दात्यांना एपीआय श्री जाधव साहेब व पी एस आय श्री ठाकरे साहेब व गावातील मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सय्यद फाउंडेशनचे अध्यक्ष अर्शद अली उपाध्यक्ष नूर अली मुनसफ अली सचिव अखलाक अहमद सचिव कमर अली आसिफ अली यांनी परिश्रम घेतले.

मुस्लिम युवकांनी कासोदा गावात प्रथमच रक्तदान शिबिराचे आयोजन केले.

जाणकारांचे उमटलेल्या प्रतिक्रिया
सैय्यद फाउंडेशन यांनी रक्तदान शिबिराच्या पायंडा पाडला,
गावातील रुग्णांना रक्तदाना च्या लाभ मिळेल  ,
सैय्यद फाउंडेशन यांनी समाजोपयोगी कार्यक्रम राबवावे अशी अपेक्षा गावकऱ्यांनी केली,
close