shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांच्या २२९ व्या जयंती निमित्ताने राजगुरूनगर येथे अभिवादन..!!

विद्याधर साळवे , राजगुरूनगर प्रतिनिधी, दि.०७-०९-२०२०.


आद्य क्रांतिवीर नरवीर राजे उमाजी नाईक यांची २२९ वी जयंती राजगुरूनगर येथील गढई मैदान येथे साजरी करणेत आली. यावेळी राजे उमाजी नाईक यांचे नामफलकाचे उदघाटन शिवसेना खेड तालुका प्रमुख रामदास धनवटे यांच्या हस्ते करून नरवीर राजे उमाजी नाईक यांच्या प्रतिमेस शिवसेना उपजिल्हाप्रमुख शिवाजी वर्पे यांच्या हस्ते पुष्पहार घालून व पुजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी चंद्रकांत आप्पा भंडलकर , अशोक धनवटे , नगरसेवक सचिन मधवे , रामदास गावडे , सुयश बोडरे , राहुल पिंगळे , अनिल भंडलकर , विद्या धनवटे , मीनाक्षी गावडे , मनोहर गोरगल्ले, गंगाधर गोफणे, दीपक शितोळे, भीमराव मंडले आदी मान्यवर उपस्थित होते.
--------------------------------------------------------------------------------
close