जळगाव जिल्हा प्रतिनिधी_ श्री. प्रमोद चौधरी
एरंडोल - दि. ७ सप्टेंबर , २०२०
अशिया खंडातील मुलींची पहीली शाळा वाचविण्यासाठी व राष्ट्रीय स्मारक घोषीत करावे यासाठी “मा. तहसीलदार साहेबांना निवेदन देण्यात आले.
राष्ट्रपिता महात्मा जोतीराव फुले व माई सावित्रीआई फुले यांनी सुरू केलेल्या देशातील पहीली मुलींची शाळा भिडेवाडा पुणे . आज त्या भिडेवाड्यातील शाळेची अवस्था खुपच दयनीय झालेली आहे. हे तमाम फुले प्रेमींसाठी वेदनादायक आहे… हे ठिकाण शासनाने तात्काळ भूसंपादीत करून “राष्ट्रीय स्मारक ” म्हणुन घोषीत करून विकसीत करावे.
अन्यथा शासनाच्या विरोधात संपुर्ण महाराष्ट्रात ” *राष्ट्रीय ओ बी सी फाउंडेशन* च्या वतीने एरंडोल तालुक्यात आंदोलन करण्यात येईल यांची शासनाने गांभीर्याने दखल घ्यावी…
मा. तहसीलदार साहेबांना निवेदन देतांना
राष्ट्रीय ओ बी सी फाउंडेशन चे कार्यरते जिल्हा अध्यक्ष प्रकाश महाले तालुका अध्यक्ष नितीन महाजन ,शहर अध्यक्ष कल्पेश देशमुख,तालुका कार्यअध्यक्ष गणेश महाजन, शहर उपअध्यक्ष महेश सुतार, तालुका सचिव सोहिल पिजारी, शहर कार्यअध्यक्ष रोहीत महाजन, तालुका सोशल मीडिया प्रमुख आमोल महाजन, शहर संपर्क प्रमुख लखण चौधरी, ता, सहसचिव राहुल चौधरी, सभासद अमोल चौधरी, शेख वाशिम तंबाली, एरंडोल शहरातील समस्त फुलेप्रेमी उपस्थित होते. सदर निवेदन शासनाच्या नियमात राहुन , मास्क लावुन निवेदन देण्यात आले .

