shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

केज रोटरीच्या इमर्जन्सी रक्तदान शिबिरात नऊ रक्तदात्यांचे रक्तदान..!!

बीड । जिल्हा प्रतिनिधी : प्रकाश मुंडे:- 
अंबेजोगाई येथील शासकीय रक्तपेढीत सध्या रक्ताचा तुटवडा जानवतोय. तीन चिमुकल्या मुलांनाही रक्ताची तातडीने गरज होती. ही गरज लक्षात घेऊन रोटरी क्लब ऑफ केज ने बारा तासाच्या आत इमर्जन्सी रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिरात  महेश रामेश्वरजी जाजू, निलेश विजयकुमार शेटे, सुनील आबासाहेब देशपांडे, संकेत धनंजयराव देशमुख, बापूराव परशुराम सिंगण, दादाराव देवराव जमाले, जगदीश सुरेशचंद जी जाजू, वैभव दत्तात्रय धस, विवेक दत्तात्रय धस या नऊ रक्तदात्यांनी स्वयंमस्फुर्तपणे रक्तदान केले. वरील रक्तदात्यांमध्ये श्री दत्ता धस यांच्या दोन मुलांनी रक्तदान केले.

सर्व रक्तदात्यांचे रोटरी केज च्या वतीने अभिनंदन करण्यात आले. हे इमर्जन्सी रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी क्लबचे अध्यक्ष हनुमंत भोसले, सचिव धनराज पुरी, प्रोजेक्ट चेअरमन महेश जाजू, आयपीपी अरुण अंजान, डी एस साखरे, दादाराव जमाले, बापूराव सिंगण व इतर सदस्य यानी विशेष परिश्रम घेतले.
close