shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

व्यवसायिक प्रगतीतून आर्थिक वृद्धी करावी...जनसामान्याचे नेतृत्व राजवर्धन पाटील यांचे मत..!!

इंदापूर । प्रतिनिधी (तात्याराम पवार)
बावडा दि.२९/०९/२०२० रोजी बावडा येथे प्रणाली कलेक्शन या कापड दुकानाचे उद्घाटन करण्यात आले यावेळी वरील मत व्यक्त केले .

बावडा येथील श्री सूर्यकांत शिंदे व  श्री. चंद्रकांत शिंदे  यांचे  प्रणाली कलेक्शन या  रेडीमेड कपड्याच्या दुकानाचे  उद्घाटन राजवर्धनदादा पाटील  यांच्या हस्ते पार पडले. यावेळी जनसामान्यांचे नेतृत्व व निरा भिमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजवर्धन पाटील  म्हणाले की शिंदे बंधू यांनी आपल्या मेहनतीच्या जोरावरती  प्रामाणिकपणे कापड   व्यवसायिक क्षेत्रात आपला ठसा उमटवला आहे. आपल्या छोट्या दुकानापासून सुरुवात करून आज त्यांनी त्याचे रुपांतर मोठ्या रेडीमेड कपड्याचे उद्योगामध्ये केलेले आहे.  कापड व्यवसायात अशीच आपण उंच भरारी घेत यशाची शिखरे गाठत आपली व्यवसायिक प्रगतीतून आर्थिक वृद्धी करवी असे   या  प्रसंगी दादांनी आपले मत व्यक्त करत शिंदे यांना  व्यवसायिक प्रगतीसाठी शुभेच्छा दिल्या. या वेळी बावडा दैनिक सकाळचे बातमीदार दीपक शिंदे ,युवा नेतृत्व गणेश घोगरे.सूर्यकांत शिंदे ,चंद्रकांत शिंदे ,आनंद शिंदे , स्वानंद शिंदे, मिलिंद शिंदे, उमेश शिंदे, मोरे ,भैय्या परकाळे, रोहित देवकर ,रोहित कदम  इत्यादी मान्यवर उपस्थित होते
close