shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

राहता तालुका शिवसेना महिला आघाडीच्या संघटकपदी सौ. स्वाती परदेशी यांची निवड..!!


सावळीविहीर( प्रतिनिधी):
शिर्डी येथील शिवसेनेच्या तडफदार महिला कार्यकर्त्या सौ. स्वाती सुनिल परदेशी (कुमावत) यांची शिवसेना महिला आघाडीच्या राहता तालुका संघटकपदी नुकतीच नियुक्ती करण्यात आली असून तसे पत्र अहमदनगर जिल्हा उत्तर शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख अनिताताई विजयराव जगताप यांनी सौ. स्वाती परदेशी यांना नुकतेच दिले आहे. 

सौ. स्वाती सुनिल परदेशी या शिर्डीतील शिवसेनेच्या धडाडीचे कार्यकर्तेा असून शिवसेनेचे येथील  प्रमुख नेते सुनिल परदेशी यांच्या त्या पत्नी आहेत. सौ स्वाती सुनिल परदेशी या पूर्वीपासून निष्ठावान शिवसैनिक असून त्या नेहमी तळागाळातील कार्यकर्त्यांचा अन्याय दूर करण्यासाठी धडपडत असतात. नेहमी समाजसेवेत कार्यरत असतात. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन राज्य शिवसेना महिला आघाडी व अहमदनगर जिल्ह्याच्या उत्तर नगर महिला आघाडीच्या प्रमुख अनिताताई विजयराव जगताप यांनी त्यांची नुकतीच राहता तालुका संघटक पदी निवड केली आहे.

या पत्रात त्यांनी म्हटले आहे की ,सौ .स्वाती सुनिल परदेशी यांची निवड केल्याने राहता तालुक्यात शिवसेनेच्या महिला आघाडीला आणखीन बळ मिळेल. तळागळातील समस्या, प्रश्न त्या सोडवून गोरगरिबांना न्याय मिळवून देण्याचा सातत्याने प्रयत्न त्या करतील .असा विश्वास यावेळी त्यांनी या पत्रात व्यक्त केला आहे. सौ.स्वाती सुनिल परदेशी यांनी ही आपली राहता तालुका संघटक पदी निवड झाल्याबद्दल सर्वांचे आभार मानले आहे व आपल्यावर टाकलेली जबाबदारी आपण प्रामाणिकपणे पार पाडू असे त्यांनी यावेळी सांगितले. 

माननीय शिवसेनाप्रमुख कै. बाळासाहेब ठाकरे व मुख्यमंत्री ना. उद्धव ठाकरे .खासदार सदाशिव लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली व आशीर्वादानेआणि जिल्हाप्रमुख  रावसाहेब खवरे, जिल्हा संघटक विजयराव काळे, नानाभाऊ बावके, राहता शहर प्रमुख गणेश सोमवंशी शिर्डी उपशहरप्रमुख नाना सावंत्रे,  राहता ता. संघटक शिवाजीराजे चौधरी व शिर्डीतील सर्व पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनाने प्रेरणेने जिल्हा महिला आघाडीच्या प्रमुख सौ.अनिताताई विजयराव जगताप यांच्या नेतृत्वाखाली व राहता तालुका महिला प्रमुख कस्तूरीताई मुदलियार ,अनिता ताई सुर्वे , लक्ष्मी अासने,मिनाषी डुबल,भारती कोराटे,संगिता जगताप यांच्या प्रेरणेने राहता तालुक्यात शिवसेना महिला आघाडीआणखी बळकट करण्याचा नक्कीच प्रयत्न करू असे यावेळी त्या म्हणाल्या. सौ. स्वाती सुनिल परदेशी यांचे या निवडीबद्दल त्यांचे सर्व क्षेत्रातून अभिनंदन केले आहे.
close