पोकरा शेतीशाळेला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद..!!
केज / तालुका प्रतिनिधी ( प्रकाश मुंडे):-
केज तालुक्यातील कानडी माळी व सारणी सांगवी येथे शेतकर्यांना गुणवत्ता पुर्ण घरगुती बियाणे तयार करण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले.
सोयाबीनच्या शेंगा सध्या परिपक्व होण्याच्या स्थितीत आहेत येत्या पंधरा दिवसात सोयाबीन काढणी प्रक्रियेस सुरुवात होणार आहे दरम्यान पुढील वर्षीचा खरीप हंगाम डोळ्यासमोर ठेवून शेतकऱ्यांनी यावर्षी हाती पडणाऱ्या सोयाबीन मधूनच घरगुती दर्जेदार बियाणे तयार करण्यासंदर्भात पोकरा प्रकल्पांंतर्गत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विष्णू मिसाळ, प्रकल्प संचालक आत्मा दत्तात्रय मुळे, प्रकल्प सहाय्यक प्रताप मुंडे, अतिष चाटे यांच्या मार्गदर्शनाखाली केज तालुक्यातील कानडी माळी, सांगवी येथे शेतीशाळा घेऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. कानडी माळी येथे प्रकल्प समन्वयक शिवप्रसाद येळकर, कृषी सहाय्यक अनिल लोंढे, प्रशिक्षक अमोल सोनवणे यांनी विनोद राऊत यांच्या शेतावर प्रात्यक्षित करून दाखवून सोयाबीन काढणी करताना योग्य झाडांची निवड करणे, इतर जातीचे वाण अलग करणे, ढीग व्यवस्थित झाकून ठेवणे, मळणी करताना घ्यावयाची काळजी आणि बियाणे साठवून ठेवण्यात संदर्भात मार्गदर्शन केले. प्रकल्प समन्वयक येळकर यांनी सांगवी येथे कापूस पिकावरील बोंड अळीचे नियंत्रण, महिला बचत गटासाठी असलेल्या योजना तसेच प्रशिक्षक मिथुन घुले यांनी कापूूूूूूूूस पिकातील पातेगळ रोखण्यासंदर्भात मार्गदर्शन केले. शेतीशाळेला शाहूराव राऊत, अमित राऊत, शिवाजी राऊत, शंकर राऊत, दीपक पवार, बाळासाहेब राऊत, जालिंदर राऊत, अभिजीत केदार, बळीराम धस, दत्तात्रय केदार, सखाराम धस, विलास धस, अविनाश केदार, गयाबाई केदार, सविता धस, शांता भांगे, सुकमल केदार, गोरख बिक्कड, सुमन बिक्कड आदी शेतकरी मोठ्या संख्येनेे उपस्थित होते.

