केज / तालुका प्रतिनिधी ( प्रकाश मुंडे):-
बीड जिल्हयाच्या माजी खासदार सौ. रजनीताई अशोकराव पाटील यांच्या वर जम्मुकाश्मिरच्या प्रभिरी पदाची जबाबदारी कॉंग्रेसच्या अध्यक्षा खा. सोनियाजी गांधी यांनी आज दिली आहे. सोनीया गांधी यांनी आज काँग्रेस वर्किंग कमिटी ची घोषणा केली यामध्ये ही काँग्रेसच्या जेष्ठ नेत्या सौ. रजनीताई पाटील यांचा समावेश आहे. काँग्रेस पक्ष्यामध्ये वर्किंग कमिटीला सर्वोच्च स्थान आहे व बहुतेक राजकीय सर्व मोठे निर्णय ही कमेटी घेत असते.
माजी खासदार सौ. रजनीताई पाटील या बीड जिल्ह्यातील एक सुसंस्कृत, अभ्यासु राजकारणी म्हणून सर्व परिचित आहेत. गेली अनेक वर्षांपासून त्या सोनीयाजींच्या अत्यंत निकटवर्तीयांपैकी एक म्हणून कार्यरत आहेत. सौ. रजनीताई पाटील यांच्या निवडीबद्दल केज नगरपंचायत चे नगराध्यक्ष आदित्य पाटील, युवा नेते पशुपतीनाथ दांगट पाटील , बाळासाहेब ठोंबरे, युवा नेते अमोल डोईफोडे, प्रविण शेप, मौला सौदागर व सर्व केज मधील काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त करून अभिनंदन केले आहे. केज शहरातील विकास कामासाठी सौ. रजनीताई पाटील यांची नेहमीच धडपड असते हे विषेश. या निवडीबाबत केज मधिल सामान्य नागरिक देखील आनंद व्यक्त करत आहेत.

