shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

सुमारे ऐंशी वर्षांनंतर राज्यात नव्याने महसूल रचनेत अमुलाग्र बदल..!सात बारा मध्ये बारा प्रकारचे बदल ..!!


सावळीविहीर ( प्रतिनिधी):
 जवळजवळ सुमारे सत्तर ते ऐंशी वर्षानंतर राज्यात नव्याने महसूल रचनेत बदल होत असून नवी महसूल रचनाअंमलात येणार  आहे. त्यामुळे आता या नवीन महसूल रचने मधील सातबारा उतारा मध्ये साधारण बारा प्रकारचे बदल करण्यात येणार असून त्यामुळे सुटसुटीत व पारदर्शकपणा येणार आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्यातील शेतकरी व नागरिकांमधून मोठे समाधान व्यक्त होत आहे.

 महाराष्ट्र राज्यात नवी महसूल रचना संदर्भात महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत नुकतीच मुंबईत बैठक झाली.या बैठकीला अपर सचिव नितीन करीर, जमाबंदी आयुक्त एस. चोकलिंगम यांच्यासह महसूलचे अधिकारी ,सचिव उपस्थित होते. या बैठकीमध्ये सातबारा उतारा च्या नमुन्यात बदल करण्यास मान्यता देण्यात आली.तसा अध्यादेशही ही महाराष्ट्र राज्याच्या महसूल व वन विभागाने नुकताच पारित केला आहे. अध्यादेशामुळे आता महाराष्ट्र राज्यात नवी महसूल रचना अमलात येणार आहे.या नविन महसूल रचनेत  सातबारा उतारा मध्ये साधारण बारा प्रकारचे बदल करण्यात येणार असून प्रत्येक गावासाठी युनिकोड प्रत्येक सातबारा उताऱ्यावर वॉटरमार्क सह शासनाचा लोगो आणि क्यूआर कोड राहणार असून हे सातबारा चे वैशिष्ट्य ठरणार आहे. 

महाराष्ट्र राज्य शासनाच्या महसूल विभागामार्फत महाराष्ट्रातील ग्रामीण पातळीवरील महसूली लेखांकन पद्धतीत या पुढे बदल होणार असून  ब्रिटिश काळात हार्टनेल अँडरसन यांनी  तयार केलेल्या मॅन्युअल मध्ये 1941 मध्ये एम जे देसाई यांनी सुधारणा  केल्या होत्या.त्यानंतर सुमारे आठ दशकानंतर ही नवी महसुल।रचनेत बदल होणार।आहे, सातबारा उतारा यात १२ नविन बदल होणार आहेत.

आता गांव,व खातेदाराचा स्वतंत्र कोड नंबर, गाव नमुना नंबर 7 मध्ये गावाच्या नावासह( एल जी डी ) स्थानिक शासनाचा कोड ,तसेचलागवड योग्य व खराबा क्षेत्र दाखवले जाणार आहे.हेक्टर,आर सोबत अक्रुषक ,उतारावर चौ,मी,नोंद ,खातेदाराचानंबर, युनिक क्रंमाक,राहणार आहे,त्यामुळे कामकाजात पारदर्शकता येईल.असे बोलले जात आहे. यामुळे शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे. ग्राम पातळीवरील या बदलामुळे ग्रामीण भागातील महसुली वाद मिटण्यास मोठी मदत होणार आहे.
close