shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

विक्रांतदादा शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त मित्रमंडळाच्या वतीने भव्य नोकरी महोत्सवाचे आयोजन..!!

कंदार ।  प्रतिनिधी :
कोरोना विषाणूच्या जागतिक महामारीर्मुळे मोठ्या प्रमाणात निर्माण झालेल्या बेरोजगारीमुळे हजारो युवक मोठ्या संकटात सापडले असून कोरोनाच्या संकटात बेरोजगारीवर मात करण्यासाठी विक्रांत दादा शिंदे मित्र मंडळ लोहा, कंधार तालुक्याच्या वतीने भव्य नोकर भरती महामेळाव्याचे  आयोजन करण्यात आले आहे. लोहा, कंधार विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय ,कर्तव्यदक्ष आमदार श्यामसुंदर शिंदे व सामाजिक कार्यकर्ते सौ .आशाताई शिंदे यांच्या मार्गदर्शनाने व संकल्पनेतुन  विक्रांत दादा शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य नोकर भरती  महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. 

सदरील नोकर भरती महामेळाव्या मध्ये अनेक जागांची भरती नामांकीत कंपन्यांमध्ये करण्यात येणार असल्याचे प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे. लोहा येथील आमदार शामसुंदर शिंदे यांच्या जनसंपर्क कार्यालय कंधार येथे विविध विभागातील manufacturing,IT,
banking, finance,Retail,BPO, KPO,Heathcare, security,facility,
hospitality,Real Estate, Automobile, agriculture,pesticide, fertilizer,media, अशा विविध क्षेत्रातील नामवंत कंपन्यांमध्ये युवक-युवतींच्या ऑनलाइन मुलाखती होणार आहेत. सदरील नोकर भरतीसाठी उमेदवारांची शैक्षणिक पात्रता पाचवी ते दहावी, बारावी पास, पदवीधर, पदव्युत्तर, आयटीआय, डिप्लोमा इत्यादी विविध क्षेत्रात वरीलपैकी कोणतेही शिक्षण घेतलेल्या युवक-युवतींना सहभागी होता येईल.

वरील पदासाठी इच्छुक उमेदवारांनी बोला ॲप वर किंवा http://www.bola.co.in/jobs या लिंक वर ऑनलाईन फॉर्म भरणे आवश्यक आहे. इच्छुक उमेदवारांनी सदरील नोकर भरती महामेळाव्यात ऑनलाईन नोंदणी त्वरित करून घ्यावी व ऑनलाईन नोंदणी केलेल्या उमेदवारास मुलाखतीस दिनांक 14 सप्टेंबर 2020 ते 25 सप्टेंबर2020  पर्यंत कंधार येथील संपर्क कार्यालयात बोला अँप च्या माध्यमातून बोलावण्यात येईल. 

या नोकर भरती  महामेळाव्यामुळे कोरोनाच्या संकटात सापडलेल्या हजारो सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींना मोठा फायदा होणार आहे. तरी लोहा, कंधार मतदार संघातील सुशिक्षित बेरोजगार जास्तीत जास्त युवक युवतींनी या नोकर भरती महामेळाव्याच्या सुवर्णसंधीचा लाभ घेण्याचे आवाहन विक्रांत दादा मित्रमंडळाचे संस्थापक, अध्यक्ष, विक्रांतदादा श्यामसुंदर शिंदे यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
close