shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

मालमत्तेच्या वादातून तरुणांचा खून करणाऱ्या आरोपीच्या चेंबूर पोलिसांनी आवळ्या मुसक्या..!!

चेंबूर पोलिसांची दमदार कारवाई ५ जणांना केली अटक..!!

प्रतिनिधी । मोहन शेगर
मुबंई :- तलवारीने वार करून तरुणाचा खून करणाऱ्या ५ जणांना चेंबूर पोलिसांनी अटक केली. मालमत्तेच्या वादातून आरोपींने तरुणाचा खून केला, अशी माहिती तपासादरम्यान निष्पन्न झाल्याचे मुंबईतील चेंबूर पोलिसांनी सांगितले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतील चेंबूर परिसरात 4 सप्टेंबर रोजी अनिकेत गुंजाळ (२३) याचा तलवारीने वार करून खून करण्यात आला. 



या प्रकरणी चेंबूर पोलिसांनी (गु. र. क्र. ३९६ / २०२०) भादंवि कलम ३०२, ३९६, १४३, १४७, १४८, १४९, ४५०, ४५२, ३२४, १२०(ब), १८८, २६९ सह भारतीय हत्यार कायदा कलम ४, २५ सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७(१), १३५  नुससार अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा तपास करत असताना पोलिसांची पथके नाशिक, इगतपुरी, कर्जत, पुणे, सोलापूर, सातारा आदी ठिकाणी रवाना झाली. तपासादरम्यान पोलिसांच्या हाती उत्तम हिराचंद कडू (26) लागला. त्याची कसून चौकशी केली असता त्याने अनिकेतच्या खुनाची कबुली देऊ न साथीदारांची माहिती दिली. 

दरम्यान, उत्तमला पोलिसांनी बेड्या ठोकल्याचे समजताच इतर आरोपींनी पळ काढला. मात्र पोलिसांच्या पथकाने फरार आरोपींचा शोध सुरूच ठेवला. तपासादरम्यान आरोपी मुंबईत असल्याचे समजताच तपासी पोलीस पथकाने सापळा लावून सनी सुरेश जगताप (26), भगवती चंडी शर्मा ऊर्फ बब्बी (29), निशांत अशोक गुंजाळ ऊर्फ गोट्या (20), मनीष अशोक गुंजाळ (22) यांच्याही मुसक्या आवळल्या. तसेच तपासादरम्यान या आरोपींकडून एक केटीएम दुचाकी जप्त करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. 

अनिकेतच्या खुनाची उकल पूर्व प्रादेशिक विभागाचे अपर पोलीस आयुक्त संजय दराडे, परिमंडळ ६ चे उपायुक्त शशिकुमार मीना, चेंबूर विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त विश्वपाल भुजबळ, चेंबूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शालिनी शर्मा, पोलीस निरीक्षक प्रकाश बागल, पोलीस निरीक्षक हेमंत गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दळवी, सहाय्यक पोलीस निरीक्षक खरात, सहाय्यक पोलीस निरीक्षक ओलेकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक नामेकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक कदम, गुंडा पथकाचे अधिकारी पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ शिंदे, पोलीस उपनिरीक्षक प्रदीप पाटील, पोलीस उपनिरीक्षक मनोज पाटील, पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय यादव, पोलीस उपनिरीक्षक बेले, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक भोसले, हवालदार जाधव, हवालदार सोनावणे, हवालदार गोडे, हवालदार मराळ, पोलीस शिपाई पवार, पोलीस शिपाई कदम, पोलीस शिपाई चिंचोले, पोलीस शिपाई चामे, पोलीस शिपाई जाधव आदी पथकाने केली.
close