केज जिल्हा । प्रतिनिधी ( प्रकाश मुंडे) ➤भारतीय शेतकरी कामगार पक्ष आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना यांच्या वतीने केंद्र सरकारने पारित केलेल्या शेतकरी विरोधी विधेयकाची होळी करून कांदा निर्यातबंदी उठवावी याबाबत तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.
शेतकरी कामगार पकक्षाचे भाई मोहन गुंड स्वाभिमानी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल रांजणकर यांनी येथील शिवाजी चौकात शेतकरी विधेयकाची होळी केली. त्या नंतर तहसीलदारांना हे विधेयक शेतकरी विरोधी असून कांदा निर्यात बंदी उठवावी. या बाबत तहसीलदार दुलाजी मेंढके यांना एक निवेदन देण्यात आले. निवेदनात हे विधेयक रद्द करून कांद्यावरील निर्यातबंदी तात्काळ उठण्यात देण्याची मागणी केली आहे. यावेळी ज्येष्ठ नेते जे. डी. देशमुख भाई आशोक रोडे मंगेश देशमुख भागवत पवार, दत्ता गुंड, खालेक फारुकी शशिकांत मुळे, सिद्धेश्वर मुळे यांच्यासह शेतकरी आंदोलनात सहभागी झाले होते.


