shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

केज तालुक्यात विवाहित महिलेचा विनयभंग : सततच्या त्रासाला कंटाळून केला होता आत्महत्येचा प्रयत्न..!!

केज । जिल्हा प्रतिनिधी (प्रकाश मुंडे):-              केज तालुक्यातील जिवाचीवाडी येथे एका विवाहित महिलेने सततच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता त्या प्रकरणी विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


या बाबतची माहिती अशी की, जिवाचीवाडी ता. केज येथील आसाराम बाजीराव चौरे हा गावातील एका २७ वर्षीय विवाहितेस सतत त्रास देत होता. तसेच दि. २० सप्टेंबर रोजी सायं.६:०० वा. सुमाराला त्याने तिची छेड काढली होती. तसेच दि.२१ सप्टेंबर रोजी ९:०० वा.सुमारास रानुबाईचे शेत नावाने ओळखल्या जात असलेल्या शेतात पीडितेचा वाईट हेतूने डावा हात ओढुन विनयभंग केला. पिडिता ओरडल्याने तो पळून गेला आणि याची पोलीसांत तक्रार केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली होती. 

त्यामुळे सततच्या त्रासाला कंटाळून पीडित महिलेने घरात गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला परंतु तिने गळफास घेताच तिच्या दिराने गळफास सोडविल्यामुळे पीडित महिलेचा जिव वाचला. त्या नंतर तिच्यावर औषधोपचार करण्यात आले. उपचारा दरम्यान तिने दिलेल्या जबाब वरून दि. २२ रोजी केज पोलीस स्टेशनला गु.र.नं.३७७/२०२० भा.दं.वि ३५४, ३५४(अ), (१), ५०६ व ३४ नुसारआसाराम बाजीराव चौरे, बाजीराव मंदा चौरे व सिताबाई भ्र . आसाराम चौरे सर्व रा. जिवाचीवाडी यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार बाळकृष्ण मुंडे हे करीत आहेत.
close