shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

विखे पाटील व ढूस पाटील विवाहसोहळा संपन्न..! कौटुंबिक स्वरूपात विवाह सोहळा संपन्न करून शिवानी आणि वैभव ने समाजासमोर केला आदर्श निर्माण ...!!

लोणी । प्रतिनिधी :
असे छोटेखानी लग्नसमारंभ होणे ही काळाची गरज बनली असून  पुढील पिढीने यापासून बोध घ्यावा व  कोरोनात शासन नियमांचे काटेकोर पालन करून असे  छोटेखानी विवाह करून कोरोनाचा फैलाव रोखनेस मदत करावी.  त्यातुन दोन्ही कुटुंबाची  लग्नात होणारी आर्थिक उधळपट्टी थांबण्यासही मदत होईल असे मत माजी मंत्री आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी हा सोहळा संपन्न होताना मान्यवरांशी बोलताना व्यक्त केले. 


या विवाहाचे खास वैशिष्ट्य म्हणजे कोणताही बडेजाव नाही, लग्न पत्रिका नाही, मोठा मंडप, शामियाना नाही, वाजंत्री.. ढोल ताशे नाही, लाऊड स्पीकर नाही, अक्षतांची नासाडी नाही, मंडपात पायदळी तुडविले जाणारे फेटे नाही, कोणताही सत्कार समारंभ नाही. अश्या एकदम साध्या व कौटुंबिक पद्धतीने आणि सोशल दिस्टसिंग चे सर्व नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करून अनेक अडथळ्यांची शर्यत पार करीत हा छोटेखानी लग्न सोहळा संपन्न झाला.

अहमदनगर जिल्ह्यातील राहता तालुक्याच्या लोणी येथील पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांची पंती तसेच स्व. सिंधुताई व पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील, व  सौ. मंदाताई व श्री भाऊसाहेब विखे पाटील यांची नात आणि सौ. गिताताई व विजय भाऊसाहेब विखे पाटील यांची कन्या चि. सौ. का. शिवानी यांचा शुभ विवाह  जिल्ह्यातीलच राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा विविध कार्य. सेवा सह. सोसायटी च्या मा. संचालिका श्रीमती चांगुणाबाई व राहुरी सहकारी साखर कारखान्याचे मा. संचालक स्व. भिमराज रामजी ढूस पाटील यांचे नातू तसेच सौ. नंदा व महाराष्ट्र राज्याचा सर्वोच्च साहसी खेळाडू म्हणून महाराष्ट्र शासनाच्या शिव छत्रपती राज्य साहसी पुरस्काराने सन्मानित झालेले प्रथम भारतीय सुवर्णपदक विजेते आंतरराष्ट्रीय खेळाडू आप्पासाहेब भिमराज  ढूस यांचे जेष्ठ चिरंजीव आणि सौ. हेमलता व अरुण भिमराज ढूस यांचे दत्तक पुत्र चि. वैभव यांचेसी  दि. 28 रोजी लोणी येथील माजी केंद्रीय मंत्री पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटील यांचे वस्तीवर शासनाच्या कोरोना लॉक डाऊन चे नियमानुसार  दोन्हीकडील केवळ 15 पाहुण्यांच्या उपस्थितीत अगदी साध्या व कौटुंबिक पद्धतीने संपन्न झाला हे या विवाहाचे खास वैशिष्ट्य. 

तसे या विवाहाचे नियोजन जानेवारी 2020 पासून सुरु झाले होते.. मुला मुलीची पसंती, दोन्ही घरातील ज्येष्ठांची औपचारिक बोलणी आणि सम्मती सारखे सोपस्कार जानेवारी महिन्यात पार पडले. मार्च मध्ये विवाह मुहूर्त ठरला.. लग्नासाठी दोन्ही घरची धावपळ सुरू झाली. परंतु कोरोनाच्या विषानुने देशातच नव्हे संपूर्ण जगात कहर केला.. मार्च मध्ये ठरलेला लग्नसोहळा पुढे ढकलावा लागला.. पुन्हा दोन्ही घरच्या सदस्यांच्या चर्चा बैठका झाल्या.

मे महिन्याचा मुहूर्त ठरला.. परंतु तो पर्यंत कोरोणाचे संकट आणखी गडद झाले.. शासनाने लॉक डाऊन जाहीर केले, सर्व बाजूने अडचणीत वाढ झाली, तोपर्यंत शासनाने लग्न समारंभास निर्बंध घातले, पुन्हा लग्न सोहळा पुढे ढकलावा लागला. जुलै महिन्यार्यंत कोरोनाचे संकट कमी होईल या आशेने पुन्हा तिसऱ्यांदा जुलै पर्यंत लग्न पुढे ढकलण्यात आले.   सप्टेंबर मध्ये पितृपक्ष लागणार होते म्हणून मुलीचे चुलते माजी मंत्री आ. राधाकृष्णजी विखे पाटील यांचे पुढाकाराने हा विवाह सोहळा 28 ऑगस्ट 2020 रोजी कोरोना चे सर्व नियमांचे काटेकोर पालन करून अगदी साध्या पद्धतीने पार पाडण्याचे ठरले. त्यांनी नुसते ठरविले नाही तर संपूर्ण सोहळा पार पडेपर्यंत ते या सोहळ्यात जातीने हजर राहिले. 

दिनांक 28 रोजी सकाळी 11 ते 12 लग्नाला उपस्थित 15 पाहुण्यांसह घरातील 15 सदस्यांना घरगुती पद्धतीचं मिष्टान्न भोजन, दू.  12 ते 01 लग्न विधी, 01 ते 02 वा. लग्न सोहळा आणि दुपारी 02.15 वा. मुलीची बिदायी असा छोटेखानी विवाह सोहळा संपन्न झाला. अवास्तव खर्चाला फाटा देत अगदी साध्या पद्धतीने हा विवाह सोहळा संपन्न झाल्याने ढूस परिवाराचे वतीने आप्पासाहेब ढूस यांनी आ. राधाकृष्ण विखे पाटील यांचे आभार व्यक्त केले. 

या विवाह प्रसंगी विखे पाटील कुटुंबातील जेष्ठ सदस्य तथा मुलीचे आजी सौ. मंदाताई व  आजोबा भाऊसाहेब विठ्ठलराव  विखे पाटील, चुलते माजी मंत्री व आ. राधाकृष्ण विखे पाटील,  सौ. स्मिता व श्री विक्रांत विखे पाटील, डॉ. मृण्मयी  व. डॉ.  विक्रम विखे पाटील, आई  सौ. गीता व वडील  श्री विजय विखे पाटील, चुलती सौ. सुवर्णा राजेंद्र विखे पाटील, आत्या सौ. अरूनाताई घोगरे, सौ. अनिताताई कोल्हे, मामा. ऍड यशवंतराव कानवडे, श्री बाळासाहेब शिंदे आदी.. तर ढूस पाटील परिवाराचे वतीने मुलाची आजी श्रीमती चंगुनाबाई भिमराज ढूस, दत्तक माता सौ. हेमलता व दत्तक पिता श्री अरुण ढूस, आई सौ. नंदा व वडील श्री  आप्पासाहेब ढूस, चुलती सौ. मीना व चुलते श्री राजेंद्र ढूस, मामा श्री गोरख ढोकणे, आत्या सौ. मंदा व  श्री. एकनाथ कालांगडे,  सौ. संगीता व श्री सोपान सौदागर, श्री अशोकराव बोडखे आदी मान्यवर या छोटेखानी आदर्श विवाह सोहळा संपन्न करण्यासाठी उपस्थित होते..

देणाऱ्याचे हात ही घ्यावे..नात्यांच्या पलिकडे जाऊन माजी मंत्री राधाकृष्णजी विखे पाटील यांनी मला आंतरराष्ट्रीय खेळाडू म्हणून सन्मान मिळवून देण्यात सिंहाचा वाटा उचलला आहे. त्यांचे माझेवर अनंत उपकार आहेत.  त्यामुळे या विवाह सोहळ्याला नामदार साहेबांनी होकार देवून आमचा हात हातात घेतल्याने *घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात ही घ्यावे* ही म्हण प्रत्ययास आल्याचे आप्पासाहेब ढूस यांनी आमचे प्रतिनिधी जवळ भावना व्यक्त केल्या व विखे पाटील कुटुंबाचे आभार व्यक्त केले.
close