shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

चार एकर कोथिंबिरीचे केले साडेबारा लाख रुपये ..!!

शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाची व समाधानाची किंमत.
सिन्नर  :- तालुक्यातील नांदुर शिंगोटे येथील शेतकरी विनायक हेमाडे यांच्या चार एकर कोथिंबीरीच्‍या पिकाला 12 लाख 51 हजार विक्रमी उत्पादन मिळाल्याने परिसरात चर्चा होत आहे. हेमाडे यांनी 4 एकर क्षेत्रामध्ये 45 किलो बियाणे पेरली होते. 41 दिवस पिकाच्या वाढीसाठी चांगली मेहनत घेतली दापूर येथील व्यापारी शिवाजी दराडे यांनी हेमाडे कोथिंबिरीची मागणी केली. हा व्यवहार 12 लाख 51 हजार रुपयांना निश्चित झाला. शेतकऱ्याला भरघोस उत्पन्न मिळाल्यामुळे परिसरात चर्चेचा विषय आहे.

हेमाडे यांनी हिमतीवर पुढील बाजार भाव अपेक्षा न करता
कोथिंबीर पिकाची लागवड केली होती या शेतकऱ्याला लागवडीचा  निश्चितच फायदा झाल्यामुळे आनंद गगनात मावेनासा झाला. व शेतकऱ्याला कष्टाचे फळ मिळायला लागल्या मुळे शेतकरी हा आनंदी झाला. हेमाडे  यांच्या कष्टाचे फळ मिळाल्याबद्दल त्यांच्या चेहऱ्यावर आनंदाची व समाधानाची किंमत आहे.
close