हिंगोली। प्रतिनीधी(विश्वनाथ देशमुख)
दि.२१,मराठा समाजाचे आरक्षण कायम ठेवण्यात यावे तसेच इतर मागण्याचे निवेदन आज दि.२१ सप्टेंबर सोमवार रोजी सेनगांव तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने मुख्यमंत्री यांना सेनगांवचे तहसिलदार जिवकुमार कांबळे यांना देण्यात येऊन घोषणाबाजी करण्यात आली.
मराठा समाजाचे आरक्षणासाठीचे आंदोलन अजुन तिव्र व्हायला सुरुवात झाली असुन आज दि.२१ सप्टेंबर सोमवार रोजी सेनगांव तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने मुख्यमंत्री यांना सेनगांव तहसिलदार यांच्या मार्फत आरक्षण कायम ठेवण्यात यावे व इतर मागणीचे निवेदन देण्यात आले.या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की,मा.सर्वाच्च न्यायालयाने मराठा आरक्षण संदर्भात स्थगीती दिल्यामुळे हि स्थगीती उठवुन आरक्षण कायम ठेवण्यासंदर्भात पुनर्विचार याचिका दाखल करण्यात यावी.मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात त्वरीत अध्यादेश काढावा.मा.सर्वाच्च न्यायालयाने दिलेल्या स्थगीतीमुळे या प्रकरणाचा अंतिम निपटारा होईपर्यंत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सवलती,महाविद्यालयातील व वैद्यकीय महाविद्यालयातील प्रवेश प्रक्रिया चालू ठेवण्यात याव्यात.सध्या शासनाने जाहीर केलेल्या नोकर भरती संदर्भात १३ टक्के जागा मराठा समाजासाठी आरक्षीत ठेवाव्यात किंवा या प्रकरणाचा अंतिम निपटारा लागेपर्यंत नोकर भरती स्थगित ठेवण्यात यावी या मागणीचे निवेदन सेनगांव तहसिलदार कांबळे यांना देण्यात आले.यावेळी सेनगांव सकल मराठा समाज बांधवाकडुन "एक मराठा लाख मराठा","आरक्षण आमच्या हक्काचे नाही कोणाच्या बाप्पाचे" अशी घोषणा बाजी करण्यात आली.आठ दिवसात हा प्रश्न मार्गी न लागल्यास सकल मराठा समाज तीव्र आंदोलन करेल असा ही इशारा यावेळी देण्यात आला.

