केज । जिल्हा प्रतिनिधी ( प्रकाश मुंडे):-
केज येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक व माजी संघचालक तथा भाजपचे स्थापनेपासूनचे कार्यकर्ते भगवान अण्णा तेलंग वय वर्षे (८०) यांचे सोमवारी दुपारी अल्पशा अजाराने निधन झाले.
त्यांच्यावर आज सायंकाळी ६.००वाजता कळंब रोडवरील त्यांच्या शेतात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. सतत हसतमुख असणारे, वय भरपूर झाल्यावर ही तरुणाईला लाजवेल या उत्साहाने काम करणारे, केज तालुक्यामध्ये संघाचे एक खंबीर नेतृत्व, संघाच्या विविध जबाबदाऱ्या सांभाळून संघ शरणता हा गुण परिवारात उतरवणारे व आपल्या गोड आवाजात मुझे अच्छा विर बना दे मा तसेच वत्सले हे मातृभूमि वंदितो मी तुझा सदा हे गीत जगण्यातून सार्थ करणारे आदरणीय भगवानांना तेलंग यांच्या जाण्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पाश्चात पत्नी, एक मुलगा, दोन मुली, सुन, नातवंडे असा परिवार आहे.

