shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

मराठा आरक्षणासाठी सोमवारी सेनगांव तहसिलवर धडकणार बैलगाडी मोर्चा..!!



हिंगोली । प्रतिनीधी(विश्वनाथ देशमुख)
दि.२७,मराठा समाजाला दिलेले आरक्षण कायम ठेवण्याच्या मागणीसाठी मराठा शिवसैनिक सेनेच्या वतीने उद्या दि. २८ सप्टेंबर सोमवार रोजी सकाळी ११ वाजता सेनगांव तहसिल कार्यालयावर बैलगाडी मोर्चाचे आयोजन केले आहे.


सर्वाच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्याने मराठा समाज कमालीचा नाराज झाला असून मराठा समाजाला दिलेले आरक्षण कायम ठेवण्यात यावे या मागणीसाठी महाराष्ट्रात मराठा समाजाकडुन मोर्चे काढण्यात येत आहेत. याच अनुषंगाने मराठा शिवसैनिक सेनेच्या वतीने मराठा आरक्षण कायम ठेवण्याच्या मागणीसाठी सेनगांव तहसिल कार्यालयावर बैलगाडी मोर्चाचे आयोजन केले आहे.या बैलगाडी मोर्चास सेनगांव तालुक्यातील मराठा समाजाने मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन मराठा शिवसैनिक सेनेचे सेनगांव तालुकाध्यक्ष बालासाहेब रघुनाथ भिसे-पाटील व शहराध्यक्ष महादेव मारोती हारण यांनी केले आहे.
close