बीड | जिल्हा प्रतिनिधी : प्रकाश मुंडे :-
केंद्र सरकारच्यामहिला व बालकल्याण विभागा मार्फत जननी सुरक्षा योजने अंतर्गत गरोदर माता व बालकांचा मृत्यू दर रोखण्यासाठी त्यांना सकस आहारासाठी देण्यात येणाऱ्या पाच हजार रुपयाचे अनुदान टप्याटप्याने देण्यात येते मात्र बीड जिल्ह्यातील तीस टक्केच गरोदर मातांना सुरक्षा जननी योजनेचा लाभ मिळत असल्याने सत्तर टक्के गरोदर माता या लाभा पासून वंचित राहत असल्याने त्यांनाही या योजनेचा लाभ द्यावा अशी मागणी भाजपा वैद्यकीय आघाडीचे जिल्हाध्यक्ष डॉ वासुदेव नेहरकर यांनी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी बीड यांच्याकडे केली आहे.
केंद्र सरकारच्या महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने जननी सुरक्षा योजने अंतर्गत गरोदर माता व बालकांचा मृत्युदर कमी करण्यासाठी टप्याटप्याने पाच हजार रुपये दिले जातात मात्र बीड जिल्ह्यात आरोग्य विभागाच्या वतीने जननी सुरक्षा योजने अंतर्गत गरोदर महिलांना दिला जाणारा भत्ता मिळत नसल्याने ऊसतोड कामगार गरोदर माता,भटक्या विमुक्त जाती जमातीतील गरोदर माता ,व सर्व सामान्य गरीब गरोदर माता ह्या योजनेपासून वंचित राहत आहेत, जननी सुरक्षा योजनेचा लाभ जवळपास ३० टक्के गरोदर मातांना मिळत आहे तर ७० टक्के गरोदर माताना या योजनेचा लाभ मिळत नसल्याने जननी सुरक्षा योजनेचा लाभ जास्तीस्त जास्त लाभार्थी गरोदर मातांना देण्यात यावा व गरोदर माता बालमृत्यूचे प्रमाण कमी व्हावे व त्यांना सकस आहार मिळावा अशी मागणी भाजपा वैद्यकीय आघाडीचे जिल्हाध्यक्ष डॉ वासुदेव नेहरकर यांनी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी बीड यांच्याकडे केली आहे.
------------------------------------------------------------------------------------------------------
रुग्णालयात बाळंतपणासाठी आलेल्या गरोदर मातांना जननी सुरक्षा योजने अंतर्गत गरोदर माता व बालकांचा मृत्यू दर रोखण्यासाठी त्यांना सकस आहारासाठी पाच हजार रुपये त्यांच्या बँक खात्यावर टप्याटप्याने केंद्र सरकारच्या वतीने टाकण्यात येतात मात्र रुग्णालयात बाळंतपणासाठी आलेल्या महिला पैकी तीस टक्केच महिलांना याचा लाभ मिळत आहे तर या योजनेच्या लाभापासून ७० टक्के महिला वंचित राहत असल्याने या योजनेचा लाभ शंभर टक्के महिलांना देण्यासाठी रुग्णालयात बाळंतपणासाठी आलेल्या गरोदर माता कडून त्यांचे बँक खाते व आधार कार्ड घेऊन शंभर टक्के गरोदर मातांना या योजनेचा लाभ देण्यात यावा असे भाजपा वैद्यकीय आघाडीचे जिल्हाध्यक्ष डॉ वासुदेव नेहरकर यांनी बोलताना सांगितले.

