shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

शिर्डीच्या श्री साईसंस्थानचे जनसंपर्क अधिकारी मोहन यादव यांचे नासिक येथे निधन..!!


- शिर्डीसह देश-विदेशातील साईभक्ता मधून मोठी हळहळ..!!

सावळीविहीर (प्रतिनिधी):
आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र असणाऱ्या श्री साईबाबांच्या शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेच्या जनसंपर्क अधिकारी म्हणून  काम करत असलेले मोहनराव यादव यांचे नुकतेच रात्री नाशिक येथे रुग्णालयात निधन झाले.

गेल्या आठ दिवसापासून नाशिक येथे एका खासगी रुग्णालयात ते उपचार घेत होते. त्यांचे या आकस्मित निधनामुळे शिर्डी येथील नागरिक, संस्थांनचे कर्मचारी, तसेच देशविदेशातील लाखो साई भक्तां मधून मोठी हळहळ व दुःख व्यक्त होत आहे. श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेचे जनसंपर्क अधिकारी म्हणून मोहनराव यादव यांनी सोळा वर्ष काम पाहिले. ते हसत मुख व मितभाषी होते. सर्वांना आपलेसे वाटणारे जनसंपर्क अधिकारी म्हणून त्यांची देश-विदेशात  ख्याती होती. 

यादव पूर्वी संजीवनी एज्युकेशन येथे नोकरीला होते. मात्र श्री साईबाबांची सेवा व्हावी म्हणून त्यांनी शिर्डीला श्री साई संस्थांनमध्ये नोकरी पत्करली, व ते गेल्या सोळा वर्षापासून शिर्डी येथे श्री साई संस्थान मध्ये जनसंपर्क अधिकारी म्हणून काम करत होते. त्यांच्या जनसंपर्का मुळेच अनेक श्रीमंत साईभक्तांनी शिर्डीला मोठमोठ्या देणग्या व विविध वस्तू भेट दिल्या आहेत. सध्या जे्1 कोव्हीड केअर सेंटर शिर्डीला ज्या इमारतीत आहे ती इमारतही चेन्नई येथील के व्ही रमणी या दानशूर साईभक्ताच्या देणगीतून बांधून देण्यात आली आहे. व त्यासाठी मोहन यादव यांचे परिश्रम मोठे आहे. 

त्याचप्रमाणे याच कोव्हीड सेंटरला साहित्य व विविध वस्तू सामग्री देणगी रूपात नुकतेच टाटा कंपनीकडून मिळवून देण्यासाठी त्यांचे योगदान खूप होते .निस्सीम साईभक्त असणारे कै.  मोहनराव यादव यांच्या निधनाची शिर्डीत बातमी येताच मोठी शोककळा पसरली. त्यांचे मूळ गाव  सिन्नर तालुक्यातील वावी जवळील वल्हेगांव हे गाव आहे. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी एक मुलगा व एक मुलगी आहे. त्यांच्या निधनामुळे शिर्डी परिसरातील नागरिक, साई संस्थान चे कर्मचारी व देश-विदेशातील लाखो साईभक्ता मधूनही हळहळ व्यक्त होत आहे.
close