shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

बीड जिल्ह्यातील भाजपावर केज मतदारसंघाची छाप विविध विभागात चार जिल्हा अध्यक्ष...!! ईतर पदावर देखील केज तालुक्याचा वरचष्मा..!!

केज  / तालुका प्रतिनिधी ( प्रकाश मुंडे):- 
केज मतदार संघात चार जिल्हाध्यक्ष .जिल्हा सचिव पदी डॉ अतुल देशपांडे , दिलीप करपे तर डॉ वासुदेव नेहरकर यांची जिल्हा वैद्यकीय आघाडी अध्यक्षपदी  निवड. धनंजय घोळवे यांची दिव्यांग विकास आघाडी जिल्हाध्यक्षपदी, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष पदी सौ उषा रमाकांत मुंडे तसेच राणा डोईफोडे यांची ऊसतोड कामगार आघाडीच्या जिल्हा अध्यक्षपदी निवड झाली आहे. यामुळे केज मतदारसंघाचा ठसा संपूर्ण जिल्ह्यात उमटला आहे . 


केज मतदारसंघात भाजपला चार वेळा विजय मिळवता आला आहे. पहिले दोन वेळा डॉ विमलताई मुंदडा नंतर सौ. संगीता ठोंबरे व विद्यमान आ. सौ नमिता मुंदडा यांनी विजय मिळवला आहे . मतदारसंघ राखीव असला तरी राजकीय क्षेत्रात खूप मोठा दबदबा निर्माण केलेला आहे. जिल्ह्याच्या व राज्याच्या राजकारणात केज मतदारसंघ नेहमीच चर्चेत असतो. हे यावेळी झालेल्या भारतीय जनता पक्षातील नविन पदाधिकारी  निवडी मधून दिसून येत आहे . नुकत्याच राष्ट्रवादी कॉग्रेस चे जाहीर झालेले तिकीट डावलून भाजपात आलेल्या आ. सौ. नमिता मुंदडा यांच्या कार्यकर्त्यांनाही सन्मानाची पदे दिली असल्यामुळे नव्या जुन्यात ताळमेळ राखला असल्याचे चित्र दिसून येत आहे. 

यामुळेच जिल्ह्यातील महिला आघाडी वर माजी जि. प. सदस्या सौ. उषा रमाकांत मुंडे , वैद्यकिय आघाडी  जिल्हा अध्यक्षपदी डॉ. वसुदेव नेहरकर , दिव्यांग आघाडी धनंजय घोळवे व ऊसतोड आघाडी बीड जिल्हाध्यक्ष पदी राणा डोईफोडे यांची निवड . तसेच सचिव पदी डॉ अतुल देशपांडे , दिलीप करपे , जिल्हा उपाध्यक्षपदी अनिरुध्द शिंदे यांच्या निवडी ने जिल्हा कार्यकारीणीवर केज मतदारसंघाची जबरदस्त छाप दिसून येत आहे . 

भाजपा कार्यकारणीवर झालेल्या निवडी वरून केज मतदारसंघ व तालुक्याच्या सर्व प्रश्नांची सोडवणूक करून विकासात्मक कामे होतील अश्या अपेक्षा व्यक्त होत आहेत . नुसत्या रस्ते , नाल्याच्या कामासोबतच औद्योगिक क्षेत्रातही केज ची छाप पडावी यासाठी हे नवनियुक्त पदाधिकारी कार्य करतील अश्या प्रकारच्या चर्चा मतदारसंघात होत आहेत. 

विशेष करून डॉ. वासुदेव नेहरकर या एकनिष्ठ कार्यक्रत्याला न्याय मिळाल्याची भावना सर्व सामान्य जनते मधून व्यक्त होत आहे. वरील सर्व पदाधिकारी यांचे स्वागत आमदार नमिता मुंदडा, अक्षय भैया मुंदडा, समाजसेवक नंदकिशोर मुंदडा (काकाजी) व भाजपाचे केज , माजलगाव मतदारसंघातील लोकप्रिय लोकनेते  रमेश आडसकर व जिल्हा परिषद सदस्य विजयकांत मुंडे यांनी केले आहे.
close