लोहा तालुका प्रतिनिधी (अशोक सोनकांबळे):
शहरातील विविध विकास कामासाठी 5 कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला असून या विकास निधीतील विकास कामाचे भूमिपूजन खा प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या शुभ हस्ते आज सोमवार रोजी होणार आहे या कार्यक्रमाला आपल्या लातूर लोकसभेचे खासदार या भागाचे आमदार यांच्या सह मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे. तेंव्हा या विकास कामाच्या भूमिपूजनास शहरातील नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन नगराध्यक्ष गजानन सावकार सूर्यवंशी, मुख्याधिकारी अशोक मोकले यांनी केले आहे.
लोहा शहराचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी नगराध्यक्ष व त्यांचे सर्व सहकारी प्रयत्नशील असतात. शहराच्या विकासाकडे नांदेड जिल्ह्याचे खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांचे विशेष लक्ष असते. खा चिखलीकर आणि नगराध्यक्ष यांच्या प्रयत्नामुळे शहरातील विकास कामे झपाट्याने होत असल्याचे दिसून येते. शहरातील विविध विकास कामासाठी 5 कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला असून या निधीतून होणाऱ्या कामाचे भूमिपूजन खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या हस्ते होणार आहे.
या कार्यक्रमाला खा. सुधाकर श्रगारे, आमदार शामसुंदर शिंदे, माजी नगराध्यक्ष कल्याण सावकार सूर्यवंशी, भाजपच्या महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा तथा जि. प. सदस्या प्रणीताताई चिखलीकर, जि. प. सदस्य चंद्रसेन पाटील गौडगावकर, पं. स. चे सभापती आनंदराव पाटील शिंदे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती बालाजी पाटील मारतळेकर, भाजपचे तालुका अध्यक्ष तथा उपनगराध्यक्ष शरद पाटील पवार, भाजपचे प्रदेश सचिव छत्रपती दादा धुतमल, अनु.जाती प्रदेश कार्यकारणी सदस्य माणिकराव मुकदम, माजी नगराध्यक्ष किरण सावकार वटमवार, माजी उपनगराध्यक्ष राम सावकार सूर्यवंशी, गटनेता करीम भाई शेख आदी मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे.
तेंव्हा या कार्यक्रमाला बहुसंख्येने उपस्थित राहावे असे आवाहन न. पा. च्या वतीने नगराध्यक्ष गजानन सावकार सूर्यवंशी, मुख्याधिकारी अशोक मोकले यांच्या वतीने आव्हान करण्यात येत आहे.

