shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

Breaking, केंद्रीय मंञी 74 वर्षीय राम विलास पासवान यांचे निधन...; बिहार राजकारणात पोकळी..!!

दिल्ली:
अनेक वेगवेगळ्याा सरकारांमध्ये काम केलेल्या राम विलास पासवान यांचे  निधन झाल्याचे खुद्द त्यांचा मुलगा चिराग याने ट्वीटवर त्यांचा हसतमुख चेहरा व चिराग सोबत असलेला फोटो टाकून म्हटले आहे की आज "तुम्ही जरी जग सोडून गेलात तरी माझ्यासाठी आपण कुठेही असाल सतत आशिर्वाद रूपात माझ्याबरोबर असाल, मिस यु पापा "असे व्यक्त करून त्यांना भावपूर्ण श्रध्दांजली वाहिली आहे. 

पासवान लोकसभा निवडणुकीपासूनच आजारी होते.अखेरीस दिल्ली येथील " एस्काॅर्ट हाॅस्पिटल" मध्ये भर्ती  होते, उपचार चालू असतानाच त्यांचे गुरुवारी निधन झाले. बिहारच्या राजकारणात त्यांचा अनेक वर्षांपासून सक्रिय सहभाग होता. त्यांनी बिहारमध्ये अनेक वैशिष्ट्ये पुर्ण नवनवीन योजना राबवल्या. परंतु त्यांनी अखेरीस मी बिहारला फारसे  काही देऊ शकलो असेही म्हटले होते.

 देशाच्या उन्नतीसाठी ते अखेरच्या श्वासापर्यंत झगडले.अशा या गुणी महामानवास "शिर्डी एक्सप्रेस" परीवाराकडून भावपूर्ण श्रद्धांजली.
close